शुरवीर संभाजी करवर यांची जंयती 14 जानेवारीला विविध ठिकाणी साजरी होणार : भिमराव भुसनर पाटील.
अखंड हिदुस्थानचे भुषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दहा अंगरक्षकापैकी एक शुरवीर संभाजी करवर यांची जयंती 14 जानेवारी ला संपूर्ण महाराष्ट्रात सर्व पक्षाच्या आणि विविध संघटनेच्या वतीने नेते मंडळी च्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रमुख पदाधिकारी आयोजित करणार आहेत.आपल्या स्वराज्यासाठी जीवाची पर्वा न करता लढणारे सेनापती, सरदार,मावळे,यांच्या कार्याची आठवण म्हणून नेहमीच महाराष्ट्रात आपण सर्व जण मिळुन अशा पराक्रमी शुर वीरांच्या जंयतीचे कार्यक्रम अभिमानाने साजरे करत असतो.इतिहास लेखकांनी शुरवीर संभाजी करवर यांच्या कामगिरी वर जास्त लिखाण केले नाही.असे बरेच पराक्रमी सरदार, मावळे यांचा इतिहासात उल्लेख केलेला नाही.पण त्यांनी केलेल्या कामगिरीची खरी माहिती आपल्या पूर्वजांनी प्रत्येक पिढ्यांना दिल्याने त्यांनी केलेल्या कामगिरीची आठवण म्हणून आपण सर्व जण मिळुन असे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शुरवीर संभाजी करवर यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दिघंची आटपाडी येथे आजही वाडा असुन त्या परिसरात झालेल्या युद्धाची आजही माहिती सांगितली जाते.तसेच कर्नाटक मध्ये तंजावर व नाशिक भागासह बरेच ठिकाणी च्या कामगिरीची आठवण आजही सांगितले जाते.
जंयतीचे नियोजन सर्व पक्षाचे नेते मंडळी व विविध संघटनेचे नेते मंडळी च्या उपस्थितीत साजरी करण्यात येणार आहे.