Type Here to Get Search Results !

शासकीय कर्मचार्यांचे गाव म्हणून किनिस्ते गावाची जुनी ओळख आजही कायम.प्रदीप वाघ

शासकीय कर्मचार्यांचे गाव म्हणून किनिस्ते गावाची जुनी ओळख आजही कायम.प्रदीप वाघ 

पालघर:सौरभ कामडी


यांचे प्रतिपादन 
आज धुळीवंदन व होळी च्या निमित्ताने किनिस्ते गावातील नवनियुक्त कर्मचारी व व्यावसायिकांचा सन्मान सोहळा ग्रामपंचायत किनिस्ते व टिम एन आर डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की मोखाडा तालुक्यात किनिस्ते गाव हे पुर्वी पासुन च कर्मचारी वर्गाचे गाव म्हणून ओळखले जाते, अनेक आदर्श शिक्षक या गावातुन निर्माण झाले आहेत, त्यामुळे मागील अनेक पिढ्या ह्या उच्चशिक्षित आहेत, सर्वाधिक शिक्षित लोक गावात आहेत.
आणि हिच पंरपरा नव्या पिढीने जोपासत गावातुन जवळपास 85 तरुण तरुणी शिक्षक, आरोग्य सेवक, पोलीस, होमगार्ड अशा विविध शासकीय पदावर नव्याने रुजू झाले आहेत.
कु.दुर्वेश दाते या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगात चांगले यश संपादन केले आहे.
तर काहींनी डिजिटल प्रिंटिंग प्रेस,मेडीकल शॉप व्यवसाय सुरू केला आहे.
अशा सर्व नवतरुणांचे यावेळी सन्मान पत्र,शाल देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला गावचे सरपंच योगेश दाते, उपसरपंच पंकज शिंदे, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य व क्रिकेट टीम ने चांगले नियोजन केले होते.
या कार्यक्रमा मुळे नवनिर्वाचित नोकरदार वर्गाला मोठा आनंद झाला असून अनेक तरुणांनी मनोगतातुन आयोजकांचे आभार मानले व अशा प्रकारे सत्कार केल्या मुळे मनस्वी आनंद झालेचे सांगितले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप वाघ, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद झोले, सरपंच योगेश दाते, उपसरपंच पंकज शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण शिंदे,वाकडपाडा पोलीस पाटील विठ्ठल गोडे, माजी सरपंच संजय वाघ,माजी सरपंच मंगेश दाते, पोलीस पाटील गौतम शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हिरामण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश दाते, पांडुरंग सराई,राजाराम जोशी सर, प्रकाश मडके,ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, गावातील अधिकारी, कर्मचारी जेष्ठ नागरिक, निवृत्त कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित नवनियुक्त कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad