तळोद्यात रक्त साठवणूक केंद्र सुरू करण्याची मागणी...
ग्राहक पंचायत व सहयोग सोशल ग्रुपचे निवेदन.
जिल्हा शल्य चिकित्सकांशी शिष्ट मंडळाची चर्चा.
एक महिन्यात रक्त साठवणूक केंद्र कार्यान्वित करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आश्वासन .
ग्राहक पंचायत महाराष्ट्र नंदुरबार जिल्हा व तळोदा येथील सेवाभावी संस्था सहयोग सोशल ग्रुप च्या सदस्यांनी आज शुक्रवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे त्यांच्या कार्यालयात त्याची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले याप्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्र नंदुरबार जिल्हा व सहयोग सोशल ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनात तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्त साठवणूक केंद्र सुरू करण्याची मागणी केली.शिष्ट मंडळातर्फे त्यांना तसे निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की तळोदा येतील उपजिल्हा रुग्णालयात तळोदा ,अक्कलकुवा, मोलगी ,धडगाव या आदिवासी दुर्गम भागातील रुग्ण येत असतात, त्यांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा तसेच सिकलसेल ,महिलांची प्रसूती व इतर तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना रक्ताची नितांत आवश्यकता असते मात्र तळोद्याला हे रक्त साठवणूक केंद्र नसल्याने त्यांना जिल्ह्याचे ठिकाणी रेफर करावे लागते अशा वेळेस त्यांच्या प्राणाला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण होण्याची शक्यता असते. तळोदा उपजिल्हा रुग्णालयात रक्त साठवणूक केंद्र असल्यास रुग्णाची प्राण वाचू शकतात व त्यांची गैरसोय दूर होऊ शकते. येथील उपजिल्हा रुग्णालय स्थापन झाल्यापासून रक्तपेढी सुरू करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे व रक्तपेढी सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे मात्र अजून सुरू झाली नाही त्यामुळे दुर्गम आदिवासी परिसरातील रुग्णांना आज देखील हालअपेष्टा सहन करावी लागत आहे. तरी लवकरात लवकर तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्त साठवणूक केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्र नंदुरबार जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक आर.ओ मगरे, सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष एडवोकेट.अल्पेश जैन, ग्राहक पंचायत जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी, प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पाठक, जिल्हा संघटक वासुदेव माळी, प्रवासी महासंघाचे प्राध्यापक राजाराम राणे, तालुका सचिव रमेश कुमार भाट आदी उपस्थित होते याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्साकांची चर्चा करताना शिष्टमंडळाने तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील अनेक गैरसोयी त्यांच्यासमोर मांडल्या तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरून रुग्णांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली . याप्रसंगी मंडळाशी चर्चा करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे यांनी सांगितले की उपजिल्हा रुग्णालयात एक महिन्याच्या आत रक्त साठवणूक केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले त्यांनी दिले. व सांगितले की रक्त साठवणूक केंद्रासाठी प्रशिक्षित डॉक्टर व कर्मचारी वर्ग यांची आवश्यकता असते व तसे कर्मचारी प्रशिक्षणाला पाठवून प्रशिक्षित झाल्यानंतर त्यांच्याकडे केंद्राची जबाबदारी सोपवली जाईल व ती कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी चर्चा करताना दिले. जिल्हा उप रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना सर्व आरोग्य विषयक सेवा, सुविधा उपलब्ध करून देण्यात मला आनंद होईल असेही त्यांनी शिष्टमंडळांना सांगितले. या शिष्टमंडळाशी बोलताना सकारात्मक वातावरणात चर्चा केली. व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान
ग्राहक पंचायत महाराष्ट्र नंदुरबार व सहयोग सोशल ग्रुप च्या पदाधिकाऱ्यांनी आज शिष्टमंडळा द्वारे भेट घेऊन तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्त साठवणूक केंद्र सुरू करण्याची मागणी केली तसा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग एक महिन्याच्या आत प्रशिक्षित करून रक्त साठवणूक केंद्र तळोदा उपजिल्हा रुग्णालयात कार्यान्वित करण्याचे सांगितले तळोदा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात येईल.अशी माहिती नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे यांनी सांगितली
.