तळोद्यात जीर्ण वीज तारा व खांब बदलावे मागणी
तळोदा शहरात विविध गल्लीत जीर्ण विजतारा व खांब असून मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे तर वीज वितरण कंपनीने लक्ष घालावे तारा व खांब बदलावे अशी मागणी निवेदनात केली आहे
या बाबत वीज वितरण कंपनीचे तळोदा विभागाचे अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
तळोदा शहरात कुंभार गल्ली व भोई गल्ली येथून जात असणारा मार्ग हा वर्दळीच्या मार्ग आहे , त्यात मेन रोडचे काम सुरू असल्यामुळे या वर्दळीत अजून भर पडलेली आहे ,सदर मार्गावर सडके जीर्ण झालेले खांब व जीर्ण झालेल्या विद्युत तारा ह्या धोकेदायक ठरत असून. वाहन चालक तसेच ये - जा करणाऱ्या नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. या जीर्ण तारा व वाकलेले भग्न झालेले खांब कोणत्याही क्षणाला जीवित किंवा वित्तहानीला जबाबदार ठरू शकतात. तरी आपण त्वरित कारवाई करून सदर जीर्ण तारा व खांब बदलावे या मागणीचे निवेदन
उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटील यांना निवेदन देण्यात आले
शिष्टमंडळात जगदीश वानखेडे, धनराज सोनवणे, मयुर ढोले, गिरीश वानखेडे, भरत भोई, जतीन साठे, नीरज रामोळे, कुंदन शिवदे, सचिन भोई आदी उपस्थित होते.