Type Here to Get Search Results !

जव्हार महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्सहात साजरा.



जव्हार महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्सहात साजरा.



पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर 




गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे उत्सहात आयोजन. महाविद्यालयात वर्षभर झालेले विविध उपक्रम, प्रथम येणारे विद्यार्थी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात प्रवीण्य मिळवलेले , विविध क्रीडा स्पर्धामध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड विधानसभा मतदारसंघांचे आमदार सुनील चंद्रकांत भुसारा  यांची उपस्थिती लाभली. भुसारा यांनी आपल्या अमोघ भाषणाने विद्यार्थ्यांची मने जिंकली. मी याचं महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचे सांगून मी या महाविद्यालयाचे देणे लागतो म्हणून त्यांनी महाविद्याल्याला विशेष मदत जाहीर केली. दुसरे प्रमुख पाहुणे  ईशा नाईक  सानवी फाउंडेशच्या चेअरमन वा संचालिका यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. तसेच बी. वाय. के. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. के. आर. शिंपी. यांची उपस्थिती लाभली. तसेच जव्हार महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. डी. के. गोसावी. यांचीही उपस्थिती लाभली व त्यांच्याही हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्थानिक माजी नगराध्यक्ष रियाज मणियार व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी पार पडला.




कार्यक्रमाची सुरुवात गोखले एज्युकेशन गीताने झाली त्यांनं तर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांच्या परिचय उपप्राचार्य डॉ. हेमंत मुकणे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राद्यापक शैलेश बगदाणे यांनी केले. पुरस्कार वाचनाचे कामं डॉ. महेश मुदगल यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. फारुख मुलाणी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम यांनी आपल्या मनोगतात वर्षभराचा अहवाल सादर करताना महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू सांगितल्या पण मर्यादाचाही उल्लेख केला व महाविद्यालयाच्या समस्याकडे मान्यवरांचे लक्ष केंद्रित केले व त्याचे फ्लस्वरूप म्हणून भुसारा यांनी महाविद्याल्याला यथेच्छ मदत करण्याचे आव्हान केले.

महाविद्यालयाचे भाग्य विधाते व वृक्षमित्र म्हणून प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम सरांचा सन्मान केला. वर्षभरात विविध विभागातील उत्कृष्ठ कामं करणाऱ्या प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्कृतीक कार्यक्रमातील ५४ पुरस्कार्थी विद्यार्थी, क्रीडा स्पर्धेत एकूण ४८ पुरस्कार्थी विद्यार्थी, तीन आंतर महाविद्यालयीन पुरस्कार्थी यांचा व सवयसेवकांचा यथोचित सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. राष्ट्रागीताने कार्यक्रमाची सांगता करून सर्व विद्यार्थ्यांना व मान्यवरांना स्नेहभोजनाची व्यवस्था केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News