Type Here to Get Search Results !

सहकार क्षेत्राला उज्वल भवितव्य प्राप्तीसाठी प्रयत्न - ॲड. कालिदास पाठक



सहकार क्षेत्राला उज्वल भवितव्य प्राप्तीसाठी प्रयत्न - ॲड. कालिदास पाठक


नंदुरबार :-

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले आहे.तळागळातील तथा ग्रामीण भागातील सहकार क्षेत्राला उज्वल भवितव्य असून सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. असे प्रतिपादन सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष 

 अडवोकेट कालिदास पाठक यांनी व्यक्त केले.

सहकार भारतीतर्फे 45 व्या स्थापना दिनानिमित्त 11 जानेवारी नंदुरबार जिल्हा सहकार भारतीतर्फे देसाईपुरा भागातील दीनदयाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात सुसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी महिला बचत गटाच्या प्रकोष्ठ प्रमुख कल्पना जोशी यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी पुढे बोलताना अडवोकेट कालिदास पाठक म्हणाले की, सहकार भारतीच्या माध्यमातून पतसंस्था, सहकारी बँका, बचत गट, विविध कार्यकारी सोसायटी तसेच गृहनिर्माण सोसायटी क्षेत्रासाठी कार्य सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात सहकार भारती सोबत काम करण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांनी सदस्य होण्याचे आवाहन पाठक यांनी केले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सहकार भारतीचे जिल्हा संघटनमंत्री महादू हिरणवाळे यांनीी सांगितले की, स्व. लक्ष्मणराव इनामदार यांनी 11 जानेवारी 1978 रोजी सहकार भारतीची स्थापना केली.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी संलग्न असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून देशात मोठ्या प्रमाणावर सहकार चळवळ उभी राहिली आहे. सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे हिरणवाळे म्हणाले.

 प्रारंभी सहकार गीत सादर करण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्हा सहकार भारतीतर्फे पतसंस्था क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचारी व अल्पबचत प्रतिनिधींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास सहकार भारतीचे बँक प्रकोष्टप्रमुख बाळकृष्ण वाणी, सदस्यु व दीनदयाल पतपेढीचे व्यवस्थापक पांडुरंग माळी, बी. डी. गोसावी, योगेश्वर जळगावकर, रोहिदास सौपुरे, प्रल्हाद भावसार, सुनील साळी, संभाजी पाटील, सुधाकर धामणे, रवींद्रसिंग राठोड, प्रसाद अर्थेकर, विवेक अर्थेकर,सुदाम खैरनार,कमलेश कासार, दरबारसिंग सोलंकी, महिला प्रतिनिधी कल्पना जोशी, तेजश्री पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश चव्हाण यांनी केले. आभार बी. डी. गोसावी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad