कोठार आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिले रस्ते व सायबर सुरक्षिततेचे धडे
तळोदा: तालुक्यातील कोठार येथील अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत तळोदा पोलीस ठाण्याच्या वतीने रस्ता व वाहतूक नियम तसेच सायबर सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस प्रशासनाच्या वतीने रस्ता सुरक्षा चा अभियान सुरू करण्यात आले असून त्या अंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. कर्मचारी एक भाग म्हणून कोठार येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित अनंत ज्ञानदीप व प्राथमिक आश्रम शाळेत तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षितता बाबत माहिती दिली यावेळी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षिततेच्या नियमानविषयी धडे देण्यात आले. त्याचबरोबर आजच्या काळात मोबाईलच्या अतिवापर कशाप्रकारे विद्यार्थ्यांसाठी हानिकारक आहे हे देखील पटवून सांगितले.सोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितता या विषयावर देखील मार्गदर्शन करून मोबाईल किंवा इंटरनेट हाताळताना घ्यावयाची काळजी देखील स्पष्ट करून सांगितली.
याप्रसंगी पोलीस नाईक अजय कोळी, पोलीस नाईक शशिकांत अहिरे यांनी देखील विद्यार्थ्यांशी हितगुज साधून त्यांना पोलिसांचा संबंधित कामकाजाची माहिती दिली दरम्यान सुरुवातीला मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांनी तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे आणि कर्मचाऱ्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.