मराठी भाषा संवर्धनासाठी कृतीशिल प्रयत्नांची गरज : प्रा. जमिला वळवी यांचे प्रतिपादन
अक्कलकुवा :- मराठी भाषा संवर्धन आज काळाची गरज राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सुरु झाला आहे. राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचं संवर्धन व्हावं या हेतूनं दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो.
त्या अनुषंगाने अक्कलकुवा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाचे प्रा.जमिला वळवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मराठी भाषेला प्रदीर्घ इतिहास आणि समृध्द परंपरा आहे. संत साहित्याने मराठी भाषा समृध्द करण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. या प्रदीर्घ मराठी भाषिक इतिहासामध्ये अनेक भाषिक आक्रमणे पचवून आजची मराठी जिवंत आहे. परंतु जागतिकीकरणाच्या आणि यंत्रयुगाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषा मरते आहे की काय ? अशी काहीशी साशंक परिस्थिती निर्माण झालेली दिसते.दररोज अन्य भाषेतून कितीतरी शब्दप्रयोग मराठी भाषेत येऊन मिसळत आहेत. त्यामुळे भाषिक हानी होत आहे. हे भाषिक आक्रमण थोपवून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी समाजातून कृतीशील प्रयत्न होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा.जमिला वळवी यांनी व्यक्त केले.व प्रा.पूनम माळी यांनी मराठी भाषा ही सर्व कार्यलयात बोलली गेली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
अक्कलकुवा न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला न्यायाधीश एस.एस.बडगुजर, सरकारी अभियोक्ता एम .आय.मन्सुरी अॅड.आर.आर.मराठे,अॅड. संग्राम पाडवी,अॅड.आर.टी. वसावे, अॅड.रुपसिंग वसावे,अॅड जे.टी. तडवी,अॅड.गजमल वसावे,अॅड.जे.के.राऊत,अॅड.डी. एफ.पाडवी, अॅड.पी.व्ही. वळवी,अॅड.दिपक वळवी,
आदींची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना न्यायाधीश व्ही.पी.शिंदे बोलताना ते म्हणाले कि, साधारणतः नवोदोत्तरीनंतर आपल्याकडे जागतिकीकरणाचा प्रवाह आला.
या जागतिकीकरणामुळे समाजातील सर्व स्तरातील सांस्कृतिक सपाटीकरण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.हे थांबवून भाषिक आणि सांस्कृतिक अस्मिता जिवंत ठेवायची असेल तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने जाणीवपूर्वक भाषिक कृती करणे गरजेचे आहे, व भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यामागची भूमिका विषद करून हा पंधरवडा शासनाच्या परिपत्रकानुसार घ्यावा लागतो आहे हीच मोठी शोकांतिका आहे असे अध्यक्षीय मनोगतात न्यायाधीश व्ही.पी.शिंदे यांनी व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अक्कलकुवा न्यायालयीन सहा.अधिक्षक व्ही. एस.पाडवी, हर्षल खलाणे,संतोष ठाकूर,धिरसिंग वळवी,यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अॅड.पी.आर.ठाकरे यांनी केले.