रांझणी कृषि विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक तथा तळोदा शांतीधन पतसंस्थेचे अध्यक्ष कुमारपाल जैन यांच्या ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रजासत्ताक दिनाविषयी पल्लवी वसावे, प्रज्ञा नाईक या विद्यार्थींनीनी मनोगत व्यक्त केले. तसेच गणेशोत्सव २०२२ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील प्रथम- निकीता डेमशा ठाकरे, द्वितीय- कुसुम रमेश वळवी, तृतीय- ऐश्वर्या बटेसिंग वळवी तर निबंध स्पर्धेतील प्रथम- गोपाल धनजी तडवी, द्वितीय- सुवर्णा अमरसिंग वसावे, तृतीय- वसावे नंदिनी विनोद तसेच जनरल नाॅलेज स्पर्धेतील प्रथम- ममता रेहमल पावरा, द्वितीय- सुरज अशोक पाडवी, तृतीय वळवी पंकज पंडीत विजेत्यांना पारितोषिक वितरण तसेच जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे क्रिडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडू यात खो-खो या क्रिडा स्पर्धेत महेश सिंगा नाईक, दिनेश दिवल्या ठाकरे, महेश शिरीष पाडवी, अविनाश जिवा वळवी, कुशल दिलवरसिंग पाडवी तसेच व्हाँलीबाँल क्रिडा स्पर्धेत महेंद्र चुनिलाल जांभोरे, गोपाल धनजी तडवी, चेतन हितेंद्र भारती, प्रदिप बिजला पाडवी, देवेंद्र गजानन पवार या दहा खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गुणगौरव करण्यात आला.
यावेळी रांझणी कृषि विद्यालयाच्या संचालिका दिपिकाताई जैन, रांझणीचे प्रगतिशील शेतकरी निंबाजी गवळी, प्राचार्य प्रविण जयवंत वसावे, प्रा.शरद मंगा साठे, भिक्कन पाटील, जिजाबराव पवार, राजेश पाडवी, दिपक मराठे, जितेंद्र वानखेडे, भरत ठाकरे, संतोष पाडवी तसेच विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक मराठे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य प्रविण वसावे यांनी मानले.