Type Here to Get Search Results !

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मानवनिर्मित कृत्रिम तलावात बुडून तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा अंत



अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मानवनिर्मित कृत्रिम तलावात बुडून तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा अंत


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज गोरे

 

कोरपणा तालुक्यातील आवारपूर परिसरात असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट मध्ये अल्ट्राटेक सिमेंट परिसरात याच परिसरामध्ये असलेल्या आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल विद्यालयाच्या चौथ्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा,कृत्रिम निर्मित तलावामध्ये बुडून करून अंत झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आलेली आहे यामध्ये कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेले असून, सदरचे तलाव हे अनेक दिवसापूर्वी परिसरामध्ये पाण्याचा निचरा व्हावा यासाठी करण्यात आल्याचे बोलले जाते मात्र तलावाची खोली अंत नसणारी असल्यामुळे शिवाय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कर्मी तैनात नसल्यामुळे वा सुरक्षा विषयक कोणताही सांकेतिक चिन्ह वाखुणा या ठिकाणी लावल्या नसल्यामुळे परिसरामध्ये वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुलं खेळण्याबागळण्यासाठी जात होती मात्र इथे साचून असलेल्या पाण्याला अंत नसल्यामुळे तीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी जल समाधी प्राप्त झाली. 


तलावामध्ये बुडून मरण पावलेल्या मुलांपैकी पारस सचिन गोवार दिपे वय 10 ,दर्शन शंकर बचा 10 , अर्जुन सुनील सिंग 10 असे मृतक मुलांची नावे आहे कंपनी वसाहतीमध्ये राहणाऱ्या अनेकांची मुले अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मानवनिर्मित कृत्रिम तलावामध्ये संध्याकाळच्या वेळेला गणराज्य दिनाच्या दिवशी पोहण्यासाठी गेली असता सायंकाळच्या सुमारास मुलं घरी परतली नाही त्यामुळे घरच्यांनी शोधा शोध करायला सुरुवात केली शेवटी सिमेंट कंपनीच्या परिसरातच असलेल्या तलावाच्या काठावरती तीनही मुलांच्या चपला आणि कपडे आढळून आले त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाला पाचारण करून स्थानिक गोताकुरांच्या मदतीने शोधाशोध सुरू झाली मात्र पाणी अथांग असल्यामुळे शिवाय रात्रीचा वेळ असल्यामुळे शोध मोहीम मध्यरात्री थांबवण्यात आली. 


दिनांक 27 रोज शुक्रवारला पोलीस प्रशासनाच्या वतीने चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम बोलावण्यात आली त्यांच्या माध्यमातून अवघ्या काही दोन तासामध्ये तळ भागाशी असलेल्या गाळात घडून असलेल्या तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यामुळे संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण तयार झाले असून या सर्व घटनेस कोण जबाबदार आहे असा प्रश्न तयार झालेला असून पुढील तपास गडचांदूर चे पोलीस उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजित आमले, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे ,जमादार संदीप अडकिने व त्यांचे सहकारी करीत आहे सदर घटनेबद्दल कंपनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी बोलायचा प्रयत्न केला असता त्यांनी टाळाटाळ केली.


● अल्ट्राटेक परिसरामध्ये घडलेल्या घटनेस कंपनी प्रशासन हेच जबाबदार असून त्यांनी खणलेल्या मानवनिर्मित तलावाची अनेकांना माहीत सुद्धा नाही शिवा या तलावाच्या सभोताल कोणत्याही प्रकारचा सुरक्षा कर्मी किंवा सुरक्षाविषयक सांकेतिक धोक्याची घंटा असल्याचे चिन्ह दिसत नाही त्यामुळेच ही घटना घडली असून कंपनी प्रशासनावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी येथील कामगार संघटना यांनी केली आहे

साईनाथ बुचे

( जनरल सेक्रेटरी एल अँड टी कामगार संघटना)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad