Type Here to Get Search Results !

शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजनासह ध्वजारोहण



शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजनासह ध्वजारोहण


नंदुरबार ( प्रतिनिधी )शहरातील

शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे

बालवीर चौकात भारतीय प्रजासत्ताकदिनी भारत माता पुजन आणि ध्वजारोहण करण्यात आले.




यंदा माजी नगरसेवक आणि कै.मोहनसिंग परदेशी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष किरण

नामदेव चौधरी यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. तर हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या प्रतिमेस चावरा हायस्कूलचा विद्यार्थी संस्कार किरण चौधरी याने पुष्पार्पण केले.

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी दिलीप जोशी यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी सर्वच मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी भारत माता प्रतिमेचे पूजन केले. मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मंगा चौधरी यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करीत भावी पिढीसाठी राष्ट्रीय सणा उत्सवांचे आयोजन प्रेरणादायी असल्याचे सांगितले. 




मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व प्रास्ताविकेतून सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त चि. संस्कार किरण चौधरी याच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय..वंदे मातरमच्या घोषणाा दिल्या.

ध्वजारोहण कार्यक्रमास स्मिता जोशी,

वंदना जव्हेरी, सुनिता हिरणवाळे, दिपाली गवळी, वैशाली चौधरी, भारती चौधरी, तसेच मोहन वाडीले,रामकृष्ण मोरे,भास्कर रामोळे,चुडामण पाटील, रवि पाटील,सदाशिव गवळी,आमेश कासार,विनोद चौधरी,अशोक कुंभार

पत्रकार वैभव करवंदकर, सुभाष राजपूत,दीपक सोनार,यांच्यासह परिसरातील शालेय महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे कार्याध्यक्ष संभाजीं हिरणवाळे, प्रफुल्ल राजपूत, सुदाम गवळी, विशाल हिरणवाळे, धीरेन हिरणवाळे, आदींनी केले.


 नंदुरबार येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे प्रजासत्ताकदिनी भारतमाता पूजन व ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित किरण चौधरी, महेंद्र चौधरी, महादु हिरणवाळे,दिलीप जोशी, संभाजी हिरणवाळे, आदी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad