तळोदा प्राचार्य गो.हु.महाजन न्यु हायस्कुलचे वतीने ग्रंथ दिंडीने लक्ष वेधले
तळोदा येथील शिक्षणमहर्षी प्राचार्य भाईसाहेब गाे.हु.महाजन न्यू हायस्कूल व श्री शि.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालय येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचे औचित्य साधत, ग्रंथ दिंडीचे आयोजन आले. ग्रंथ दिंडीने लक्ष वेधले होते.
अध्यापक शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य भाईसाहेब गाे.हु.महाजन यांचा जन्मशताब्दी वर्षाेत्सव आणि शासनाचा मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा या उपक्रमा अंतर्गत,
विद्यालयात टाळ, मृदंग, नृत्याचा तालात सदर ग्रंथ दिंडींचे आयाेजन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या कुशीत जन्मलेल्या व अमृता पेक्षाही गोड असलेल्या मराठी भाषा विषयी गौरवाची भावना, कौतुकास्पद असलेल्या माय मराठीची बोली तिची अस्मिता टिकावी म्हणून मराठी साहित्याची, ग्रंथांची दिंडी आज काढण्यात आली. दिंडीत साहित्यिकांचा सन्मानार्थ विद्यार्थ्यांनी आपलीवेशभूषा साकारली. यानिमित्ताने विविध विभूतींचे विलोभनीय असे दर्शन घडले. दिंडीत मराठी भाषेचा जयघाेष करीत विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नाेंदवला.
या दिंडीत उपप्राचार्य प्रा.अमरदीप महाजन यांनी मराठी भाषेचा गुणगौरव केला.
सूर्य,चंद्र तारे जोपर्यंत गगनात स्थिर असतील तोवर माय मराठीची अस्मिता ही टिकून राहील. अशी रसाळ उपमा देऊन दिंडीला शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रम विद्यालयाचे प्राचार्य ए.एच.टवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अमरदीप महाजन यांच्या नियोजनात काढण्यात आली.
या वेळी प्रथम कै. प्राचार्य भाईसाहेब गो. हू.महाजन यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन व अभिवादन करून तसेच पालखीचे व ग्रंथांचे पूजन करून प्रारंभ करण्यात आला. दिंडीचा मार्ग हा विद्यालयातून स्मारक चौका पर्यंत असा हाेता.
सदर कार्यक्रमात अ.शि.मंडळाचे अध्यक्षा मंगलाताई महाजन संस्थेचे आधारस्तंभ, मार्गदर्शक अरूणकुमार महाजन
तसेच इंग्लिश मिडीयम च्या प्राचार्या सौ.शितलताई अमरदीप महाजन
यांची विशेष उपस्थिती लाभली.
या प्रसंगी पर्यवेक्षक प्रा. बी.जी.माळी, पर्यवेक्षक प्रा. ए.एल.महाजन , वरिष्ठ लिपिक डी.पी.महाले, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.एन.एस.शिंपी , तसेच कला विभाग प्रमुख प्रा. एस.बी.मगरे ,कनिष्ठ लिपिक अजिंक्य महाजन,वरिष्ठ शिक्षक पी.आर.वळवी, पी.व्ही.मगरे,आदिंची उपस्थिती हाेती.
विद्यालयातील सर्व मराठी भाषा विषय शिक्षक श्रीमती मिनलताई राणे, पी.व्ही.सोनवणे,
ए.आर.सुर्यवंशी,
पी.व्ही.माळी आदिंनी ग्रंथदिंडी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.व्ही. गिरासे,पी.व्ही.साेनवणे यांनी तर आभार प्रदर्शन एस.एस.सूर्यवंशी यांनी केले.