Type Here to Get Search Results !

करोळे | शूरवीर संभाजी करवर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी,



अखंड हिदुस्थानचे भुषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दहा अंगरक्षकापैकी एक शुरवीर संभाजी करवर यांची जयंती 14 जानेवारी ला करोळे गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.




आपल्या स्वराज्यासाठी जीवाची पर्वा न करता लढणारे सेनापती, सरदार,मावळे,यांच्या कार्याची आठवण म्हणून नेहमीच महाराष्ट्रात आपण सर्व जण मिळुन अशा पराक्रमी शुर वीरांच्या जंयतीचे कार्यक्रम अभिमानाने साजरे करत असतो.




इतिहास लेखकांनी शुरवीर संभाजी करवर यांच्या कामगिरी वर जास्त लिखाण केले नाही.




पण असे बरेच पराक्रमी सरदार, मावळे यांचा इतिहासात उल्लेख केलेला नाही.पण त्यांनी केलेल्या कामगिरीची खरी माहिती आपल्या पूर्वजांनी प्रत्येक पिढ्यांना दिल्याने त्यांनी केलेल्या कामगिरीची आठवण म्हणून आपण सर्व जण मिळुन असे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.




शुरवीर संभाजी करवर यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दिघंची आटपाडी येथे आजही वाडा असुन त्या परिसरात झालेल्या युद्धाची आजही माहिती सांगितली जाते.




तसेच कर्नाटक मध्ये तंजावर व नाशिक भागासह बरेच ठिकाणी च्या कामगिरीची आठवण आजही सांगितले जाते.


जंयतीचे नियोजन करोळे गावातील ग्रामस्थांच्या च्या उपस्थितीत शूरवीर संभाजी करवर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad