Type Here to Get Search Results !

पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शैलेशजी वानखेडे



पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शैलेशजी वानखेडे 

यवतमाळ प्रतिनिधी :- संजय जाधव

        नुकतीच फुलसावंगी येथे नविन पत्रकार संघाची कार्यकारणी गठीत करण्यात आली. महागाव तालुका पत्रकार संघटना फुलसावंगी शाखेच्या अध्यक्षपदी शैलेशजी वानखेडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

         महागाव तालुक्यातील फुलसावंगी हे सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे जवळपास सर्वच वृत्तपत्राचे प्रतिनिधी पत्रकारीतेचे काम करतात.सर्व सामान्याच्या मागण्या शासनासमोर मांडण्याचा एक माध्यम म्हणुन वृत्तपत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. वृत्तपत्रात काम करीत असतांना गावातील सर्व वृत्तपत्र प्रतिनिधीने मिळुन काम करावे या उंदान्त हेतुने येथे पत्रकार संघाची नाविन कार्यकारणी गठीत करण्यात आली. सर्वानुमते शैलेश वानखेडे यांची फुलसावंगी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

        यावेळी विवेक पांढरे, डॉ. गजानन वैद्य, विजय पाटील, विवेक शेळके, शैलेश वानखेडे, तसलीम शेख, शेख अनिस, चंद्रशेखर पंडागळे, संजय जाधव, ,सचिन छन्नीकर, रिजवान शेख, विकी भिसे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad