Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर करण्याचे आवाहन



ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर करण्याचे आवाहन


नंदुरबार, दि.13 :- जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची कारवाई सुरू करण्यात येणार असून २० जानेवारी २०२३ पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन ) नितीन सदगीर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. 


  नंदुरबार जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबर २०२२ रोजी 123 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीमध्ये सरपंच पदाकरीता 394 उमेदवार व सदस्य पदाकरीता 2 हजार 456 असे एकूण 2 हजार 850 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. 


 प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी निवडणूक काळातील निवडणूक खर्चाचा हिशेब २० जानेवारी २०२३ पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशोब सादर न केल्यास त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये अपात्र करण्याची कारवाई करण्यात येईल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी श्री.सदगीर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad