तालुका कृषी कार्यालयाची डम्पिंग ग्राउंड सारखी अवस्था
मोखाडा कृषी कार्यालय आणि कारभार दोन्ही घाण
मोखाडा / सौरभ कामडी
मोखाडा:- केंद्र सराकरने स्वच्छ भारत चा नारा दिला प्रत्येक घर गांव कार्यालये स्वच्छ असावेत हा यामागचा खरा हेतू,
मात्र मोखाडा तालुक्यातील कृषी कार्यालय याला अपवाद आहे जेवढा ढीसाळ आणि घाणेरडा कारभार या कार्यालयाचा फिल्डवर आहे तेवढेच घाण यांचे कार्यालय असून साधी साफसफाई करण्याचाही कंटाळा येथील लेटलतीफ अधिकारी यांना असल्याने बसणे सोडा या कार्यालयात उभे राहण्यासही कोणी धजावणार नाही एवढी दंलिदर अवस्था या कार्यालयाची आहे मुळात हि ईमारत कृषी कार्यालयाची स्वतः नसली तरी ती जिल्हा परीषदेची आहे म्हणजेच सरकारी आहे.मात्र आपण काम करीत असलेल्या जागेची किमान स्वच्छता तर उपस्थित अधिकारी यांनी ठेवायली हवी मात्र एकुणच सुमार कामगिरी असलेले कृषी अधिकारी कार्यालयाच्या स्वच्छते बाबतही कमालीचे उदासीन असलेले दिसून येत आहे.
मोखाडा कृषी कार्यालय आपल्या विविध प्रकारच्या कारभारामुळे नेहमीच चर्चेत असते शेतकऱ्यांना वेळेवर न मिळणारे कृषी सहाय्यक,नेहमी बैठकांत व्यस्त असलेले कृषी अधिकारी यामुळे या कार्यालयाचा कारभार नेहमी वादात असतोच आता मात्र या कार्यालयाचे रुपांतर डंपींग ग्राउंड मध्ये झाल्याचे दिसून येत आहे कार्यालयाच्या दाराशी भंगार अवस्थेतील सरकारी बाहन उभे कार्यालयाच्या बाजुने वाढलेले गवत मोठ्याप्रमाणावर कचरा या ईमारतीच्या पोर्च मध्ये कुत्री आणि गुरांचामुक्त वावर कार्यालयात दाखल होता खोकी लाकडे बंद पडलेली मोटार सायकल अस प्रचंड भंगार सामान त्यात सगळी धुळ म्हणजे आपण सरकारी कार्यालयात आलोत एखाद्या गावच्या कचरा डेतोत आलो असा प्रश्न पडावा असे गलीच्छ चित्र या कार्यालयात आहे.
यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर सुमार कामगिरी करणाऱ्या कृषी कार्यालयाच्या स्वतःच्या कार्यालतील या घाणेच्या साम्राज्याची सर्वकडे चर्चा असून एकीकडे स्वच्छ भारत अभियान गावोगावी राबवणार्या सरकारी कार्यालयांचा स्वतःचा कारभार अवच्छेतत चालला आहे.ईमारत स्वतःची नसल्याचे कारण पुढे केले तरी आपण ज्या ईमारतीत कारभार करतो तिथे स्वच्छता ठेवण्याचे औदार्य किमान काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दाखवायला हवे एवढी माफक अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी व्यक्त करीत आहेत.