शिवळे ग्रामपंचायतला १५ वित्त आयोग फंडातून घंटा गाडी सुपूर्द!
मुरबाड दि.१६ प्रतिनिधी लक्ष्मण पवार
मुरबाड-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शिवळे ग्रामपंचायतला नुकताच मकर संक्रात दिनाचे औचित्य साधून ठाणे जि.प उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांचे हस्ते १५ वित्त आयोग फंडातून शिवळे ग्रामपंचायतला घंटा गाडी सुपूर्द करण्यात आली.तसेच शिवले ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विकास कामांचा लोकार्पण सोहळा यावेळी करण्यात आला.तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यावेळी म्हणाले की शिवळे गावाच्या अडीअडचणी असतील त्या माझ्या लक्षात आहेत मला काही सांगायची गरज नाही परंतु ठाणे जिल्हा परिषद मार्फत ठाणे जिल्ह्यातील ग्राम पातळीवर मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्हा परिषद विकास करत आहे त्याचं उदाहरण शिवळे ग्रामपंचायत मला सांगता येईल असे सुभाष संकेत सुभाष पवार यांनी यावेळी दिले.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले माजी आमदार गोटराम पवार यांनी बोलताना सांगितले की खऱ्या अर्थाने या मुरबाड तालुक्याचा विकास ठाणे जिल्हा परिषद मार्फत होत आहे तसेच जि. प. उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी फार मोठ्या प्रमाणात मुरबाड तालुका तालुक्याला निधी आणला आहे आणि तो निधी आणून प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात तालुक्याच्या ग्रामीण भागातील पातळीवर विकास होत आहे तसे नुकताच शिवळे गावाला सुद्धा जवळपास एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे असे शेवटी माजी आमदार गोटीराम पवार म्हणाले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार गोटीराम पवार, बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट ) तालुका प्रमुख कांतिलाल कंटे , मुरबाड बाजार समिती सभापती प्रा.मनोहर ईसामे , प्रा.धनाजी दळवी,सरपंच- निलिमा जाधव, उपसरपंच- नरेश इसामे, माजी सरपंच रेखा ईसामे, जगन्नाथ ईसामे, निलेश ईसामे,शिवळे सोसायटी चेअरमन हरिश्चंद्र ईसामे,
मयुर इसामे, सिमा चौधरी , लक्ष्मण खोलांबे, स्वंपनाली वाघेरे , संचिता इसामे, गुरुनाथ (बाला) इसामे , मिरा इसामे , माजी.उपसरपंच शुभांगी शिंदे व गुरुनाथ चौधरी, विनायक जाधव.ग्रामसेवक लकी पाटील यांच्यासह शिवले गावातील वयोवृद्ध नागरिक तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.