Type Here to Get Search Results !

परवानाधारकांनी शस्त्र पोलीस स्टेशनला जमा करावित - जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री



परवानाधारकांनी शस्त्र पोलीस स्टेशनला जमा करावित - जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री


 नंदुरबार, दि.16 :- महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला असून निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू झालेली आहे. या आचारसंहिता कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील शस्त्र परवाना धारकांनी त्यांचेकडील शस्त्रे ते ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात त्या पोलीस स्टेशनला जमा करावित. असे निर्देश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहेत.

 

  नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणुक मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पडावी. सार्वजनिक उपद्रव, नुकसान, जिवितास व आरोग्यास तसेच सुरक्षितपणास धोका निर्माण होऊ नये आणि मतदारात भय, दहशत निर्माण होवू नये यासाठी समितीची बैठक 9 जानेवारी रोजी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 


  या बैठकीत जे शस्त्र यापुर्वीच जमा असल्याने ते शस्त्र जमा करणेबाबत आदेश पारित करण्याची आवश्यकता नाही. शस्त्र परवानाधारकांपैकी जी शस्त्र परवानाधारक जामिनावर मुक्त झालेली आहेत, जे शस्त्र परवानाधारक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत त्यांनी व निवडणूकीत उमेदवार असलेली व्यक्ती व मतदार असलेल्या व्यक्ती यांच्याकडे शस्त्र परवाना असल्यास त्यांनी आपली शस्त्र जमा करावित.


न्यायाधीश दर्जा, बँकेचे व कॅश वाहतूक करणारे सुरक्षा कर्मचारी, सोने, चांदी व हिरे व्यापारी यांचेकडे असलेले नोंदणीकृत सुरक्षारक्षक व नोंदणीकृत खाजगी सुरक्षारक्षक यांना त्यांचेकडे असलेले शस्त्र जमा करण्यास सुट देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर शस्त्र बाळगण्यावरील निर्बंध आपोआप रद्द होतील आणि जमा केलेली शस्त्रे परवानाधारकांना मतमोजणीच्या एका आठवड्यानंतर परत करण्यात येतील. विनापरवाना अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही यासाठी आयोगाच्या निर्देशानुसार पोलिस विभागाने कारवाई करावी, असेही जिल्हादंडाधिकारी श्रीमती खत्री यांनी नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad