Type Here to Get Search Results !

खते व औषधावरील लिंकिंग बंद करा अन्यथा जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बेमुदत संप पुकारणार असोसिएशनच्या वतीने निवेदन



खते कंपन्या इतर खते आणी औषधी लिंकीग करत असुन ते बंद करावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बेमुदत बंद पुकारणार असा इशारा फर्टिलायझर्स पेस्टी साईड्स सिड्स डीलर असोसिएशन वतीने निवेदनात दिला


 नंदुरबार प्रमाणात रासायनिक खते कंपन्या इतर खते आणी औषधी लिंकीग करत असुन ते बंद करावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बेमुदत बंद करण्यात येतील असा इशारा फर्टिलायझर्स पेस्टी साईड्स सिड्स डीलर असोसिएशन वतीने निवेदनात दिला आहे.



जिल्ह्यातील डीलर असोशिअशन तर्फे जिल्ह्यातील सर्व रा. खत वितरक व विक्रेते निवेदन देतो की.. सध्या अनेक खत कंपन्या रासायनिक खतांच्या सोबत लिंकिंग मटेरियल घेण्यास विक्रेत्यांना भाग पाडत आहेत. लिंकिंग शिवाय कंपन्या खत पुरवठा करण्यास तयार होत नाहीत. शासनाने सुद्धा कंपन्यांना लिंकिंग न करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच विक्रेत्यांना सुद्धा लिंकिंग केल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा दिलेला आहे. लिंकिंग मुळे शेतकरी आणि विक्रेते यांच्यात वाद विवाद होत आहेत. शेतकऱ्यांना काही प्रमुख रासायनिक खतांच्या ग्रेड ची आवश्यकता आहे. मात्र त्या खतांवर लिंकिंग मटेरियल घ्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. व विक्रेत्यांचे व शेतकऱ्यांचे संबंध बिघडत आहेत. विक्रेत्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. या समस्येवर आपण स्वतः लक्ष घालून लिंकिंग बंद करण्याविषयी कंपन्यांना कडक सूचना द्याव्यात हि विनंती. कंपन्यांनी लिंकिंग बंद न केल्यास जिल्ह्यातील सर्व रासायनिक खत विक्रेते बेमुदत आपली दुकाने बंद ठेवतील याची नोंद घ्यावी. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीची संपूर्ण जबाबदारी खत कंपन्यांची राहील असा इशारा निवेदनात दिला आहे

यावेळी असोसिएशन जिल्हा अध्यक्ष शाम राजपूत, राजेश वाणी कन्हैयालाल पाटील जितेंद्र पाटील अमीत ठक्कर तयैबभाई बोहरीआदीसह जिल्ह्यातील डीलर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad