Type Here to Get Search Results !

थंडीत कुडकूडत पडलेल्यांच्या अंगावर ब्लॅंकेट टाकत आतापर्यंत १३५५ बेघरांच्या अंगावर " मायेची उब "



कडाक्याच्या थंडीत घरात पांघरूणात गाढ झोपायचे सोडून धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर व त्यांची टीम गेल्या २७ दिवसापासून दररोज मध्यरात्री नांदेड शहरातील विविध रस्त्यावर थंडीत कुडकूडत पडलेल्यांच्या अंगावर ब्लॅंकेट टाकत आतापर्यंत या हिवाळ्यात १३५५ बेघरांच्या अंगावर " मायेची उब " पांघरली आहे.या वर्षीच्या संकल्प पूर्तीसाठी आणखी ६६८ ब्लॅंकेट ची आवश्यकता असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. 


 भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून हा उपक्रम चार वर्ष्यापासून सुरु आहे.या वर्षी ॲड.बी.एच.निरणे, चंद्रकांत केरबा गंजेवार,ॲड. दिलीप ठाकूर यांनी प्रत्येकी १०० ब्लॅंकेट दिले आहेत. डॉ.सविता व डॉ. यशवंत चव्हाण यांनी ६० तर सचिन व सुरज बंकटलाल राठी यांनी ५० ,गोविंद रामराव किन्हाळकर यांनी ३५ ब्लॅंकेट साठी सहकार्य केले आहे.प्रत्येकी २५ ब्लॅंकेट साठी योगदान करण्यात येते. देणगी देणाऱ्या दात्यांचे रबरप्रिंटद्वारे ब्लॅंकेटवर नाव टाकून देणगीदारांच्या हस्ते वाटप करण्यात अशी माहिती एडवोकेट दिलीप भाऊ ठाकूर यांनी दिली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad