Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करुन अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते,- पोलीस अधीक्षक श्रीकृष्णा कोकाटे



विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करुन अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते,- पोलीस अधीक्षक श्रीकृष्णा कोकाटे 

अर्धापुरात पत्रकार संघाच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप, मान्यवरांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.




अर्धापूर दि.१६ तालुका प्रतिनिधी :-- विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करुन अभ्यास केल्यास कोणतेही यश संपादन करणे अवघड नाही.पोली प्रशासनाच्या वतीने युथ लिडर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.समाजातील गरजु, हुशार विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करण्यात येत आहे.रंगगी बेरंगी कपडे घालणारे आपले आदर्श होवू शकत नाहीत.सामजात विधायक कार्य करुन सामाजिक बांधिलकी जोपासनारे आपले आदर्श आहेत.पत्रकार संघाचा गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप हा चांगला उपक्रम आहे असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक श्रीकृष्णा कोकाटे यांनी सोमवारी (दि १६) केले.




पत्रकार संघाच्या वतीने दर्पण पुरस्कार व गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप मान्यवरांचा उपस्थितती शहरातील नरहरी स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्यात शैक्षणिक,सामाजिक,शेती, आरोग्य, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी विकास माने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उज्वला पांगरकर,मुख्याधिकारी शैलेश फडसे,गटशिक्षण अधिकारी व्यंकटेश चौधरी,प्राचार्य के के पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी अनिल शिरफुले,दैनिक समीक्षाचे संपादक रुपेश पाडमुख,दैनिक गाववालचे संपादक वत्सल दगडु,पोलीस निरीक्षक अशोक जाधव नायब तहसीलदार मारोतराव जगताप,तोटावाड,तालुका आरोग्य अधिकारी आकाश देशमुख, महामार्गाचे उपनिरीक्षक आदित्य लाकूळे,वि.अ.एस पी गोखले,गोविंद मोटरवार,आदी उपस्थित होते.




तालुका अध्यक्ष नागोराव भांगे पाटील यांनी प्रास्ताविक करुन पत्रकार संघाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.उपजिल्हाधिकारी विकास माने यांनी पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कामांचा गोरव केला.या सोहळ्यात प्राचार्य के के पाटील, डॉ ओमप्रकाश जडे रुपाली कांबळे संतोष राऊत, केशव दादजवार,वजीर बी दायी, गजानन दिवसे,राजेश चौधरी,रामेश्वर काकडे,उषा नळगे,कुंता दुधाटे, भागवत निरगुडे,अजिंक्य राजे देशमुख,अविनाश बादलवाड, लक्ष्मीकांत मुळें आदिंचा दर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या सोहळ्याचे सुत्रसंचलन रामराव भालेराव यांनी केले तर आभार उध्दव सरोदे यांनी केले या सोहळ्यास नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उपनगराध्यक्ष प्र.मुसवीर खतीब,संजय देशमुख लहानकर,कृष्णा देशमुख,आर आर देशमुख,श्यामराव पाटील,डॉ उत्तमराव इंगळे,संतोष गव्हाणे,बालाजी गव्हाणे,शहराध्यक्ष राजू शेटे,पप्पु पाटील कोंढेकर,मिर्झा पप्पू बेग,मिर्झा फसीउल्ला बेग,नगरसेवक सलीम खुरेशी,डॉ मुखतारोद्दीन काजी,दत्ता पाटील पांगरीकर,मारोतराव गव्हाणे, साहेबराव हाट्टेकर, प्रा.मो.ईस्माईल,अमोल डोंगरे,सुधाकर इंगळे,सुधाकर कदम,अवधूत कदम, अशोक बुटले,विलास कापसे, सदाशिव देशमुख,डॉ विशाल लंगडे, सुभाष लोणे,जठन मुळे,उध्वराव राजेगोरे,हानुमंतराव राजेगोरे,बाळू पाटील,रामदास पत्रे,गोविंद भरकड, गिरजाराव नरोटे,कचरू पाटील, नारायणराव गोदरे,प्रा संतोष लंगडे, कुश भांगे,आकाश देशमुख पार्डीकर, दिलीप डाढळे,आदी उपस्थित होते.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad