तळोदा कनिष्ठ महाविद्यालय येथे आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कनिष्ठ महाविद्यालय तळोदा, जि. नंदुरबार येथे आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
तळोदा येथील आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी.बी. हुंबरे, पर्यवेक्षक प्रा.के. आर. पद्मर तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. उषा पावरा, प्रा. प्रभावती वसावे यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांनी कशाप्रकारे समाजाचा विरोध पत्करून मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली याविषयी माहिती दिली. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.एस.के. तडवी, प्रा.सुवर्णा गिरासे,प्रा.हेमंत चौधरी ,प्रा. छोटू ठाकरे, प्रा.नितीन मगरे, प्रा. ज्योती मगरे , प्रा. सुषमा टवाळे प्रा. रुचा माळी ,प्रा.निषाद माळी प्रा.पितांबर वळवी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रोहित पिंपरे व आभार प्रदर्शन प्राध्यापक जयेश मगरे यांनी केले.