मुरबाड शहरातील मराठी मुलींच्या शाळेची दुरावस्था देवेंद्र जाधव यांनी केली प्रशासनाकडे तक्रार
. मुरबाड दिनांक 4/प्रतिनीधी (लक्ष्मण पवार )
..ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली मुरबाड शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 ही शाळा सध्या अनेक समस्यांनी ग्रस्त आहे.
या शाळेत विद्यार्थ्यांकरिता असलेल्या शौचालयाची अवस्था सध्या अत्यंत बिकट आहे. त्याकडे सबंधित व्यवस्थापनाचे व प्रशासनाचे मात्र साफ दुर्लक्ष आहे.
तुटलेल्या शौचालयात जाणे अवघड वाटत असल्याने येथील विद्यार्थिनींना शौचालयासाठी घरी जावे लागते. शाळा मोठी असतानाही विद्यार्थिनींसाठी टॉयलेट व्यवस्था नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे.
याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मुरबाड चे माजी शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव यांनी गटविकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी मुरबाड पंचायत समिती यांच्या कडे केली आहे.अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे
मुरबाड मधील वॉर्ड क्रमांक 14 मध्ये ही मराठी मुलींची शाळा आहे. या शाळेच्या बाथरूम ची अवस्था ही अत्यंत वाइट आहे. त्यामुळे शालेय समिती व गटशिक्षणाधिकारी यांनी लवकरात लवकर त्या समस्येवर तोडगा काढला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असे देवेंद्र जाधव यांनी निवेदनातून इशारा दिला आहे