नेमसुशील माध्यमिक विद्यामंदिरात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
तळोदा येथील नेमसुशील माध्यमिक विद्यामंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सुनील परदेशी व श्रीमोती माध्यमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती.भावना डोंगरे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.विद्यार्थ्यांना ज्येष्ठ शिक्षक आय.पी. बैसाणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रम प्रसंगी विद्यामंदिरातील शिक्षक रेखा मोरे, रवींद्र गुरव, सचिन पंचभाई,राधिका कलाल,वैशाली नरसिंगे,माधुरी पाटील,कोमल सोनवणे,मोनिका पंत, मिलिंदकुमार पाटोळे, चुनिलाल वळवी, संदीप वसावे, विनायक गुरव, बादल वसावे शिक्षकेतर कर्मचारी नितीन भामरे, समाधान मराठे हे उपस्थित होते.