उजेणी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष यांना विविध विकास कामाचे निवेदन
पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर
वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उजेणी या ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त सरपंच कृष्णा रोज, उपसरपंच प्रकाश लहागे दिनांक 20 जानेवारी रोजी यांनी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री प्रकाश निकम साहेब यांची पालघर येथे चेंबर मध्ये प्रत्यक्ष भेट घेऊन, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, स्मशानभूमी इमारत, ग्रामपंचायत हद्दीतील आठवडी बाजार विकसित केंद्र करणे. असे एकूण दहा ग्रामपंचायत मध्ये विकास कामाची जिल्हा परिषद अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरपंच कृष्णा रोज बोलताना सांगत होते की ग्रुप ग्रामपंचायत उजेणी या ग्रामपंचायत मध्ये विविध मतदारसंघांमध्ये वार्ड. मध्ये आरोग्याच्या समस्या, रोजगाराच्या समस्या, शैक्षणिक समस्या, सरकारी योजना, आरोग्य शिबिर, बालकुपोषण, गुणवंत मुलाचा सत्कार, या गोष्टीवर माझा विशेष भर असून येणारा काळामध्ये सरपंच या नात्याने कशाप्रकारे सक्षम होतील त्याच्याकडे माझा प्रमुख लक्ष असून सर्व जनतेला सर्व समाजाला सर्व गावांना कशाप्रकारे चांगल्या पद्धतीने विकास कामे होतील त्याच्याकडे माझा गांभीर्याने विकास कामाचे करण्यासाठी माझा प्रयत्न आहे .