Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना " कृतज्ञता सेवेचा " हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले



राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या समारोहात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना " कृतज्ञता सेवेचा " हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दिलीप ठाकूर यांचा हा ७६ वा पुरस्कार आहे. 


अर्धापूर प्रतिनिधी राजेश पळसकर


 शुभारंभ मंगल कार्यालय नांदेड येथे झालेल्या कृतज्ञता समारोहाच्या वेळी नांदेड भूषण डॉ. शिवाजीराव शिंदे,रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे सहकार्यवाह अरुण डंके, जिल्हा संघचालक डॉ. सुधीर कोकरे,शहर संघचालक डॉ. गोपाळ राठी, डॉ. प्रकाश पोपशेटवार, पद्मजा जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.वर्ष भरात जगवेगळे ७८ उपक्रम राबविणारे दिलीप ठाकूर, अन्नदानात अग्रेसर असलेले स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष सुनील शर्मा,हिंदू ऐकतेसाठी परिश्रम घेणारे श्रीराम जन्मोत्सव समितीचे डॉ.रमेश नारलावार,जेष्ठ समाजसेवक विजय मालपाणी तसेच सतत कार्यरत असलेली साईप्रसाद संघटना यांना मान्यवारांच्या हस्ते स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ व ग्रंथभेट देऊन " कृतज्ञता सेवेचा " या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी हळदी कुंकू कार्यक्रमात मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या. दीप प्रज्वलना नंतर प्रास्ताविक करताना कार्यवाह डॉ.प्रदीप वेसणेकर यांनी जनकल्याण समितीतर्फे नांदेड उपक्रमाची माहिती दिली.अरुण डंके यांनी आपल्या भाषणातून सेवा कशी असावी याचे सविस्तर विवेचन केले.डॉ. शिंदे यांनी विविध दाखले देत सेवा करण्याऱ्या व्यक्तींना कसे समाधान मिळते ते ओघवत्या शैलीत पटवून दिले. या प्रसंगी सेवा कार्यात सतत कार्यमग्न असणारे देबडवार गुरुजी, मुकुंद धानोरकर,..... यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकमाच्या सुरुवातीला शास्वती बैस हिने तर शेवटी श्वेता देशमुख यांनी पसायदान म्हटले. सूत्रसंचलन श्रुती देशमुख यांनी तर आभार कृष्णा किनगी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश निळेकर,राधिका धानोरकर,चंद्रकांत देगावकर, अनघा शृंगारपुरे यांनी परिश्रम घेतले.अल्पोहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.दिलीप ठाकूर यांना नुकतेच लायन्स सेवा पदक मिळाल्यानंतर " कृतज्ञता सेवेचा "हा आणखी एक पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News