नेमसुशिल शैक्षणिक समूहातर्फे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन
तळोदा :- शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहातर्फे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जिव्हाळा जोपासणारा हळदी कुंकू सोहळा आयोजित करण्यात आला.यावेळी विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त महिला स्पर्धकांना संस्थेकडून आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महिला पालकांनी उत्फुर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाची रंगत वाढवली महिला शिक्षिकांनी देखील गाणी नृत्य सादर करून कलात्मक वातावरणात निर्मिती केली यावेळी संस्थेच्या संचालिका सौ सोनाभाभी तुरखीया मुख्या. श्रीमती पुष्पा बागुल मुख्या. भावना डोंगरे उपप्राचार्या कल्याणी वडाळकर सौ.कुवरबेन पटेल,नलिनी शहा सौ.रेखामोरे सौ.प्रतिभा बैसाणे सौ.दिपाली पाटिल सौ.अर्चना पाडवी सौ.अश्विनी भोपे निलिमा वसावे सौ.दिपाली देवरे सौ निकम आदी शिक्षिका व मोठ्या संख्येने महिला पालक उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा मोरे यांनी केले तर आभार प्रतिभा बैसाणे यांनी मानले.