तळोद्याचे भरत माळी यांना पुरस्कार समाजभूषण पुरस्कार प्रदान
औरंगाबाद येथील महात्मा फुले समाज विकास मंडळातर्फे येथील माजी नगराध्यक्ष तथा कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरत बबनराव माळी यांना माळी समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तळोदा येथील भरत बबनराव माळी यांच्या समाजाबद्दल असलेल्या योगदानाबद्दल व समाजगंगेप्रती वाहून घेतलेल्या कार्याबद्दल आस्थेबद्दल माळी समाजभूषण पुरस्कार्थी म्हणून निवड करण्यात आली होती. त्या अनुषंगाने औरंगाबाद येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे सहकार अतुल यांच्या मंत्री सावे हस्ते भरत माळी यांना माळी समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी सोबत शिरपूर येथील माजी नगराध्यक्ष रावसाहेब प्रभाकर चव्हाण, नानाभाऊ पोपट महाजन आदी उपस्थित होते. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल भरत माळी यांचे समस्त काच माळी समाज पंच तळोदातर्फे अभिनंदन करण्यात आले.