बालकांना जंकफूड देणे टाळण्यासाठी बचपन व ब्लॉसम स्कूलतर्फे आवाहन
तळोदा; जंक फूड खाल्ल्याने लहान मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास योग्य पध्दतीने होत नाही ,त्यामुळे जंक फूड देणे टाळा असे आव्हान बचपन व ब्लॉसम स्कूल तळोदा यांच्याकडून सोशल मीडिया तसेच पालकांच्या व्यक्तिगत भेटीसाठीदरम्यान करण्यात येत आहे.
आजकाल जंकफूड खाणे हे स्टेटस सिम्बॉल बनत चालले असून यात बालक अग्रेसर असुन त्यांना विशेष क्रेझ असून पिझ्झा ,पास्ता ,बर्गर ,केक हॉट डॉग, फ्रेंच फ्राईज, डोनट्स चायनीज हे नावे लहान बालकांच्या तोंडी पाठ झाले असुन मुलांमध्ये जंक फूडच्या सेवनाने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून त्यांना पोषक तत्वे मिळत नसल्याने त्याची वाढ खुंटत असल्याचे चित्र आहेत .मुलाच्या चांगल्या वाढीसाठी आहाराचे खूप महत्त्व असून मुलांना सकस ,चौकस आहार द्यावा असे आव्हानही बचपन व ब्लॉसम स्कूलकडून करण्यात येत आहे
दरम्यान जंक फुडमध्ये शरीराला पोषक गोष्टी कमी व हानिकारक गोष्टी जास्त असल्याचे पटवून देण्यात येत असून त्यात फॅट्स, मीठ ,साखर, विविध रसायने असतात तसेच पदार्थ लज्जतदार येण्यासाठी सरार्सपणे रंगांचे वापर केला जात असल्याने बालकांच्या आरोग्यास हानिकारक असतात हेही पटवुन देण्यात येत आहे.
यासाठी स्कूलचे चेअरमन डॉ योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य विजयकुमार पाटील, उपप्राचार्य सकिना मर्चंट तसेच कर्मचारी मेहनत घेत आहेत.