जिद्द चिकाटीने यश प्राप्त करून समाजाची सेवा करावे- डॉ अभिजित मोरे आरोग्य शिबिरात 220 जणांना लाभ
तळोदा मराठा समाजासाठी डॉ.परांडे हे आदर्श आहेत. समाजातील प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यावा. लोकांनी ही असेच जिद्दीने मेहनतीने शिक्षण घेत उच्चस्व पदावर स्थान मिळवून समाजाचे नावलौकिक करावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी डॉ.परांडे व मराठा समाजाच्या संयुक्त विद्यमाने तळोदा येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात व्यक्त केले.
तळोदा येथील श्री क्षत्रिय मराठा समाज बहुद्देशीय सेवाभावी संस्था, व डॉ.परांडे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा २२० नागरिकांनी लाभ घेतला.
या शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष तथा जिजामाता शैक्षणिक संस्था चे सचिव डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यसपीठावर ईश्वर पवार, शांतीलाल गायकवाड, पुरुषोत्तम चव्हाण,हिम्मतराव चौहान,डॉ.रामराव आघाडे, संजय उगले, नरेंद्र सूर्यवंशी, सदाशिव साळुंखे, भगवान शिंदे, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष योगेश मराठे, डॉ.शिरीष परांडे, डॉ.केतकी परांडे उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ. मोरे म्हणाले की, कोणत्याही समाजातील मुलगा जेव्हा उच्चशिक्षित होतो व त्याच्या माध्यमातून जेव्हा समाजाची सेवा घडते तेव्हा त्या व्यक्तीचे कौतुक करण्याची मोह समाजाकडून आवरला जात नसतो. यामुळे समाजातील प्रत्येकाने डॉ.शिरीष परांडे हे मराठा समाजाचे आदर्श आहे त्याचा आदर्श समाजाने घेतला पाहिजे. असे ते म्हणाले. यावेळी एच के चव्हाण, सुनीता शिंदे, योगेश मराठे, डॉ.शिरीष परांडे, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष नवनित शिंदे, उपाध्यक्ष प्रल्हाद फोके, सचिव महेंद्र गाढे, कोषाध्यक्ष भास्कर मराठे, सदस्य अशोक चव्हाण, शांताराम गायकवाड, धनराज शिंदे, योगेश जाधव, गणेश शिंदे, दिनेश गाढे, संदीप नवले, तसेच मराठा चौकातील युवकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम ओ पवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.अविनाश मराठे यांनी केले.