Type Here to Get Search Results !

हर घर नळ योजनेचा विजयगड येथे खेळ खंडोबा.



हर घर नळ योजनेचा विजयगड येथे खेळ खंडोबा.


मोखाडा /सौरभ कामडी 

जल जीवन मिशन २०२१-२२ अंतर्गत विजयगड, ता.वाडा येथे नवीन नळ पाणीपुरवठा योजना शासन परिपत्रक नुसार ८७लाख रुपयाची या गावातील रहिवाशी यांना कोणतीही आवश्यकता नसताना प्रशासनाच्या भोंगळ आर्थिक नियोजनामुळे मंजूर करण्यात आली आहे. 

            गावातील ९९टक्के कुटुंबाकडे वैयक्तिक बोअरिंग असून उर्वरित १ टक्के कुटुंब हे शासकीय हातपंप चा वापर करत आहेत. तसेच गावातील काचरेपाडा येथील कुटुंबांसाठी या आधी तीन पाण्याच्या टाक्या बांधून त्यांच्या आतापर्यंत योग्य वापर होत आहे. असे असताना हर घर नल योजनेच्या नावाखाली शासन परिपत्रक जारी करून शासकीय आर्थिक नियोजन ढासळून त्याचा अपव्यवहार करण्यासाठीच ही योजना गावामध्ये राबवली जात आहे असे नागरिकांचे स्पष्ट म्हणणे आहे. तसेच सदर परिपत्रक मध्ये स्पष्ट लिहिण्यात आले आहे की, काम पूर्ण झाल्यानंतर नंतर सदरहू योजनेची संपूर्ण जबाबदारी (साफ करणे, पुरवठा करणे, नियोजन करणे) ही ग्रामपंचायत ची असेल. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत ही प्रत्येक कुटुंबाला आपल्या करामध्ये पाणी पट्टी लावून देणार. याचाच अर्थ जनतेला सदर योजनेची आवश्यकता नसताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना विनाकारण पाणी पट्टी भरावी लागेल. डोंगस्ते ग्रामपंचायत मध्ये आतापर्यंत आरसीसी बांधकाम असलेल्या घरांच्या घरपट्टी या साध्या दरात भरल्या जात असताना गरीब जनतेला लुबडण्यासाठी हा पाणी पट्टी चा थाट मांडला जातो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

          जल जिवन मिशन आपल्याकडे व्हावी याकरिता ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, गावचे पोलिस पाटील ग्रा. पं. सदस्य आणि इतर ठराविक प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत मध्ये कोणतीही माहिती न देता, ग्रामपंचायत ची कागदपत्रे पूर्तता न करता तसेच आचारसंहिता भंग करून उद्घाटन करण्यात आले. या योजनेची गावातील नागरिकांना कोणतीही आवश्यकता नसल्यामुळे हा निधी वाया न घालवता गरजू गावासाठी वापरण्यात यावा, अशी प्रतिक्रिया गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.



ही योजना जिल्ह्यातून असल्यावरून आम्हाला काहीच कल्पना नाही तसेच परिपत्रक नुसार कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता केली नाही. कार्याचे केलेले उद्घाटन आम्हाला माहीत नव्हते.

ग्रामसेविका:अर्पिता म्हात्रे


*पाणी योजना आली म्हणजे तुम्ही पाणी नाही घेतले तरी पाणी कुठूनही वापरा त्यासाठीचा कर भरावाच लागेल.*

*गटविकास अधिकारी,वाडा:राजेंद्र खटाळ*



*आमच्याकडे स्वतःच्या बोअरिंग असल्यामुळे आम्ही पाण्यासाठी ग्रामपंचायतला वेगळा कर देणार नाही. असे असल्यास ग्रामपंचायत ने आम्हाला आमच्या बोरिंगचे पैसे द्यावेत. आमच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नये तसेच विनाकारण कर लादू नये.*

*नागरिक*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News