आश्रमशाळा माण येथे ३७ जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न.
पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर
रोटरी क्लब ऑफ मुंबई इलिगेंट आयोजित शिव छत्रपती समाजसेवा मंडळ जुचंद्र-वसई व आदिवासी शैक्षणिक व सामाजिक संस्था जव्हार यांच्या सहकार्याने आज रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा माण ता. विक्रमगड येथे ३७ जोडप्याचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला असून यावेळी प्रमुख पाहुणे विनिता प्रताप अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ मुबंई इलिजेंट,अमितजी बगाडिया विश्वस्त बगाडिया चॅरिटेबल ट्रस्ट मुबंई, यशवंत वातास अध्यक्ष आदिवासी व शैक्षणिक संस्था जव्हार, रोहीदासजी पाटील संस्थापक एस.एन.कॉलेज भाईंदर पूर्व ,पुरुषोत्तम पाटील संस्थापक शिव छत्रपती समाजसेवा मंडळ जुचंद्र ,जगताप साहेब पोलीस उपनिरीक्षक विक्रमगड, रामकृष्ण दिग्रसकर आदिवासी सेवक, के आर एज्युकेशनल सोशल फाउंडेशन पालघरच्या सचिव सौ.कमल रमेश माळी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. सुरवातीला सर्व जोडप्याना कपडे देऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सर्व जोडप्यांना लग्न मंडपात आणून एका सरळ रांगेत उभे करून सुरवातीला गणेश पूजन नंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत,त्यानंतर दुपारी १२:३५ वाजता विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर कन्यादान व होमविधी कार्यक्रम घेण्यात आला.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व जोडप्याना मंगळसूत्र ,संसार उपयोगी साहित्य, खुर्च्या व इतर साहित्याची मदत करण्यात आली. तसेच उपस्थित सर्व वधू -वर व त्याच्यासोबत आलेल्या वऱ्हाडी मंडळींना गोड जेवण देण्यात आले.सदर सामुदायिक विवाह सोहळा अतिशय थाटामाटा हा संपन्न झाला. यावेळी रोटरी क्लब ऑफ मुंबई ईलिगेंट सर्व पदाधिकारी,सभासद व शिवछत्रपती समाजसेवा मंडळ जुचंद्र- वसई चे पदाधिकारी ,ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थी यांनी उपस्थित होते. तसेच अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण व स्व. उल्हासराव भोईर आश्रणशाळा माण व ग्रामस्थ मंडळ माण यांनी व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश गोतरणे, चेतन ठाकरे,रमेश माळी सर यांनी केले.