मुरबाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर
भाजपचे अण्णा साळवे यांनी केले गौरव पत्र देऊन अभिनंदन!
मुरबाड दिनांक 30 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
:- मुरबाड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी प्रसाद पांढरे यांना भारताचा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याने मुरबाडचे कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांचे खंदे समर्थक भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मुरबाड तालुका अध्यक्ष अण्णा साळवे यांनी विशेष असं" गौरव पत्र "देऊन अभिनंदन केले.
याबाबत सविस्तर वृत असे की, मुरबाड तालुक्यात मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पी आय पांढरे साहेब यांनी चोख असं कर्तव्य बाजवल्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.
कायदा सुव्यवस्था कशी राखवी याबाबत जिल्ह्यासह महारष्ट्रातील पोलिसांनी आदर्श घ्यावा असं काम त्यानी मुरबाडला केले आहे.
न्यायिक भूमिका बजावून प्रत्येकाला न्याय देण्याच काम केले आहे. मुरबाड शहरांत आणि तालुक्यात रात्रीची गस्त वाढवून चोऱ्या, दरोडे अवैध धंदे यांच्यावर आळा घालण्याचं काम केले
.मुरबाड मध्ये राजकारण असो की समाजकारण किंवा कार्यक्रम यांना चांगल्या प्रकारे चोख बंदोबस्त देऊन आपले उत्तम कर्तव्य बजावण्याचे काम केले.
मुरबाड तालुक्यातील अनेक शाळा, कॉलेज मध्ये जाऊन कायद्याचे शिक्षण देण्याचे काम पी आय प्रसाद पांढरे यांनी केले. यामधून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम देखील केले आहे
. पोलीस स्टेशनं मध्ये जर भांडण आले तर ते समोपचाराने मिटवण्याचे काम त्यांनी केले आहे, अनेक संसार उद्धवस्त होतात यासाठी गावठी दारू सारखे अवैध धंदे बंद करून एक चांगल आदर्शवत काम त्यांनी केले आहे. यासारखे अनेक कामे केल्याने आणि अनेकांच्या आशिर्वादामुळे आज मुरबाड तालुक्याचे नाव पांढरे साहेबांमुळे दिल्लीच्या तखतावर पोहचवण्याचे काम केले आहे.
या अभिमानास्पद कामगिरीचा अभिमान म्हणून मुरबाडचे सुपुत्र आणि भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा मुरबाड तालुका अध्यक्ष अण्णा साळवे यांनी गौरव पत्र देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.