प्रवासी महासंघाच्या वतीने एस टी चालक व वाहकांचा सन्मान
तळोदा: येथिल बस स्थानकात प्रवासी महासंघाच्या वतीने प्रवासी दिन व प्रवासी महासंघाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने एस टी चालक, वाहक व प्रवाश्यांचा सत्कार करण्यात आला.
तळोदा बस स्थानकात आयोजित कार्यक्रमाला प्रवासी महासंघाचे व महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष आर ओ मगरे, अशोक सूर्यवंशी,तळोदा शाखा अध्यक्ष राजेश चौधरी,सचिव पंडित भामरे,सदस्य भूषण येवले,एड.अल्पेश जैन,राजाराम राणे, मुस्तफा बोहरी,आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला सुरुवातीला अशोक सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या स्थापनेविषयी माहिती दिली.
कार्यक्रमात तळोदा बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक विनोद जावरे श्रीमती वंदना गोसावी,चालक जे.एम राहसे,रवींद्र पाडवी, वाहक आर के गायकवाड के आर साठे, यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्प देवून सत्कार करण्यात आला व त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सूत्रसंचालन अशोक सूर्यवंशी यांनी केले तर आभार पंडित भामरे यांनी मानले.