चिनोदा येथे जैविक शेतीबाबत मार्गदर्शन
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील महात्मा गांधी विद्यालयात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नवभारत फर्टीलायझर्स लिमिटेड कंपनीतर्फे गावात प्रभात फेरी काढून जैविक शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
नवभारत कंपनीकडून विद्यार्थ्यांना चॉकलेट तर सामाजिक कार्यकर्ता कपिल मराठे यांच्यातर्फे बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी गावातील शेतकऱ्यांना नवभारत फर्टीलायझर्स लिमिटेड कंपनीचे अधिकारी गोपाल लाळगे यांनी शेतकऱ्यांना जैविक शेती बद्दल मार्गदर्शन केले. रासायनिक शेतीमुळे होणारे जमीन नुकसान खूप होत असून जास्त रासायनिक वापरून जमीन नापीक झाली आहे. त्यामुळे जैविक शेती ही करणे आवश्यक आहे याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सरपंच सुषमा नाईक, उपसरपंच राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक भरत पाटील, सतिष निकम, मनोज जावरे, मुकेश कर्णकार, वसंत निकम, हेमलता पाटील, समाधान पाटील, मंगला चव्हाण, जगदीश माळके, विवेक पोतदार, चंदू ठाकरे, नितिन पवार, अंगणवाडी सेविका, शेतकरी, ग्रामस्थ आदींसह नवभारत फर्टीलायझर्स कंपनीचे अधिकारी मनोज कोळी, राकेश चव्हाण, दिपक जाधव, शशिकांत कोळी, मनोज मराठे, विद्यार्थी व विद्यार्थींनी आदी उपस्थित होते.