Type Here to Get Search Results !

चिनोदा जय श्रीराम भजनी मंडळातर्फे भजनाच्या माध्यमातून जनजागृती



चिनोदा जय श्रीराम भजनी मंडळातर्फे भजनाच्या माध्यमातून जनजागृती



 तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील जय श्रीराम समस्त गांवकरी भजनी मंडळ हे भजनाच्या माध्यमातून जनजागृती करत असून गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात वारकरी संप्रदायाच्या महतीतून लोकांमध्ये भागवताचा प्रचार प्रसार करत आहेत. या भजनी मंडळात एकवीस भजनी सदस्य असून त्यात तुकोबांच्या अभंगातून, माऊलींच्या ज्ञानेश्वरीतून तसेच नामदेव महाराज, संत जनाबाई यांच्या अभंगातून व विशेष म्हणजे एकनाथ महाराजांच्या भारुडातून समाजात फोफावलेली व्यसनाधिनता दूर व्हावी, धार्मिकता रुजावी तसेच व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबळी, बेटी बचाव आदी जनजागृतीचे व प्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. 

      भजनाच्या माध्यमातून गेल्या बारा ते पंधरा वर्षांपासून तळोदा तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेले श्रीक्षेत्र रांझणी येथे दरवर्षी आषाढी एकादशी निमित्ताने एक दिवसीय भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन या भजनी मंडळाकडून करण्यात येत असते. यात ज्या भाविकांना मोठ्या दिंडीत सहभागी होता येत नाही असे भाविक या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात. व तळोदा तालुक्यातील भाविक या दिंडीचे अश्व रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. त्याच बरोबर दरवर्षी होणार्‍या श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथा सप्ताह, कानबाई उत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमी, हनुमान जयंती आदी धार्मिक कार्यासह सुख-दुःख:च्या प्रसंगीही हे भजनी मंडळ सहभागी होत असतात. 

      भक्तीगीतांसोबतच सामाजिक अनिष्ट रुढी-परंपरा यांना फाटा देऊन विज्ञानाचे महत्त्व पटवून देणार्‍या आधुनिक भजन गीतांच्या माध्यमातून ही जनजागृती केली जाते. दिवसभर काबाडकष्ट करून आल्यानंतरही या भजनी मंडळाचे सदस्य मंडळी हे नियमितपणे गावातील मंदिरात भजने गाऊन आनंदाने श्रमपरिहार करतात. आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतूने हे कार्य अंगीकारले असून जय श्रीराम समस्त गांवकरी भजनी मंडळ हे चिनोदासह परिसरातील गांवामध्ये या भजनी मंडळाच्या कार्यक्रमांचे आयोजन होते. त्यात आपल्या सुरेल व लयबद्ध भजनांच्या माध्यमातून प्रबोधन व जनजागृती सुरू आहे. 

      तसेच या मंडळाचे सदस्य मृदंगचार्य सचिन पाटील, ईश्वर पाटील, हार्मोनिमाचार्य निंबाजी पटेल, सुरेश मराठे, विणेकरी रणछोड पाटील, गायक सुनिल पवार, किशोर पाटील, छगन मराठे, बबन पाटील, संतोष मराठे, अशोक पाटील, प्रकाश मराठे, भटा मराठे, उध्दव मराठे, दिपक मराठे, आनंदा मराठे, रोहिदास पाटील, बंन्सीलाल पटेल, पांडुरंग पाटील, भाऊराव मराठे, सुरेश पाटील, डिगंबर पाटील, राजेंद्र मराठे आदी भजनी मंडळाचे सदस्य हे भजनी मंडळाचे कार्य वर्षानुवर्षे अविरतपणे परिश्रम घेऊन चिनोदासह परिसरात जनजागृती व प्रबोधन करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News