संपूर्ण महाराष्ट्रात धडकणार आदिवासी बांधवांचा मोर्चा
मुरबाड दिनांक 29 /प्रतिनीधी लक्ष्मण पवार
पालघर जिल्ह्यात येणारे विनाश कारी प्रकल्प रद्द करावेत, बुलेट ट्रेन वाढवण रद्द करावे, घराखालील जमीन आदिवासी लोकांच्या नावावर कराव्यात , बोगस आदिवासी भरती रद्द करावी, अनुसूचीत क्षेत्रातील सवैधानिक तरतुदी यांचे उल्लघन करणे बंद करावे व संविधानाचे पालन करावे व अन्य मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचा उद्या संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चा धडकणार आहे.
आदिवासी एकता परिषद. बिरसा फायटर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून हा मोर्चा निघणार आहे. अशी माहिती कोकण विभाग अध्यक्ष राजाभाऊ सरनोबत यांनी दिली आहे. जास्तीत जास्त संख्येने आदिवासी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.