तळोदा तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षिस वितरण व समारोपाच्या कार्यक्रम संपन्न
तळोदा तालुका प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि शिक्षण विभाग पंचायत समिती तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने तळोदा तालुका विज्ञान प्रदर्शन दुधाबाई पाडवी माध्यमिक व गंगाधर शिवराम शिंपी कनिष्ठ (कला) महाविद्यालय सोमावल बु येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षिस वितरण व समारोपाच्या कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी वसंत पाटील, केंद्रप्रमुख जगन्नाथ मराठे, मुख्याध्यापक निमेश सुर्यवंशी, अजित टवाळे, भास्कर मराठे, सुनील परदेशी, कालूसिंग पाडवी,अतुल सुर्यवंशी, व्यासपीठावर उपस्थित होते.
परीक्षक प्रा. डॉ. एस. आर. गोसावी, प्रा. डॉ. स्वप्नील वाणी, प्रा एल. एन. पाटील यांनी काम पाहिले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विजय चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी तेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
उच्च प्राथमिक गटात
प्रथम नेमसुशिल प्राथ विद्यामंदिर तळोदा,
कुः योगिनी सुनिल परदेशी आमच्यासाठी गणित
द्वितीय:- विद्यागौरव इंग्लिश मिडीअम स्कुल, आमलाड
तनय विश्वास पवार
वाहतूक सिग्नल
तृतीय नेमसुशिल इंग्लिश मिडीअम स्कुल, तळोदा
कु. निवेदिता रविंद्र गुरव
फूट स्टेप पावर जनरेटर
राखीव न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळोदा
वरुण विनोद नाईक
होलोग्राम टेकनॉलॉजी
माध्यमिक/ उच्च माध्यमिक गट
प्रथम न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळोदा
मोहीत चंद्रकांत माळी,
बायोस्कोप
द्वितीय श्रीमोती विद्यामंदिर तळोदा
मयुर प्रविण सोनवणे
वॉटर हार्वेस्टिंग बाय रोड
तृतीय
न्यू हायस्कूल व कनिष्ठ महा. तळोदा
कु. मानसी प्रमोद सोनवणे
मशरूम शेती
राखीव एस.एन. चौधरी माध्य. विद्या. वाल्हेरी
शहीद निर्मलसिंग वळवी
जुगाड कार्बनी संयुगांचा
उच्च प्राथमिक गट शिक्षक
जि प शाळा धवळीविहिर
अनिल सीताराम सोनवणे
वैदीक गणित व प्राथमिक गणितीय क्रिया
माध्यमिक शिक्षक गट
डी पी एम विद्यालय सोमावल
दिपक अंबालाल शेंडे
आरसे व प्रकाशाचा खेळातून विज्ञान
प्रयोगशाळा परिचर गट
माध्यमिक आश्रमशाळा नर्मदानगर
अस्लम बशीर खाटीक
इलेक्ट्रिक बेल