आधारभूत किमतीत कडधान्य खरेदीला 15 जानेवारी पर्यंत वाढीव मुदतवाढ
नंदुरबार, :- जिल्ह्यात खरीप हंगाम 2022-23 मध्ये केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत निश्चित केलेल्या हमीभावाने मका, ज्वारी व बाजरी खरेदीस ऑनलाईन पोर्टलवर 7 जानेवारी,2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी रविवार 15 जानेवारी,2023 पर्यंत वाढीव मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एस.बी.सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
ज्या शेतकऱ्यांना मका, ज्वारी व बाजरी विक्री करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांनी स्वत: नोंदणीसाठी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी नोंदणीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या हमीभाव योजनेचा लाभ घेवून मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन ही श्री.सोनवणे यांनी केले आहे.