चिनोदा येथील महात्मा गांधी विद्यालयात सायकली वाटप
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयातील १६ विद्यार्थींनींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिनोदा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रोहिदास शंकर पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रकाश सुदाम पटेल, वेणीलाल रामदास पाटील, तुकाराम नामदेव मराठे आदी उपस्थित होते.
मानव विकास मिशन योजनेंतर्गत विद्यालयापासून २ ते ३ किलोमीटर अंतरावरील नवागांव येथील इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी च्या व विद्यार्थींनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. परिसरातील खेड्यापाड्यावरील विद्यार्थींनींना विद्यालयात जा-ये करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र मानव विकास मिशन योजनेंतर्गत सायकल मिळाल्याने या विद्यार्थींनींना विद्यालयात वेळेवर जाणे-येणे सोयीचे होणार आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सतिष निकम, मनोज जावरे, मुकेश कर्णकार, वसंत निकम, हेमलता पाटील, समाधान पाटील, जगदीश माळके, विवेक पोतदार, चंदू ठाकरे, नितिन पवार आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश कर्णकार यांनी केले तर आभार प्रदर्शन समाधान पाटील यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.