धडगांव येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
धडगाव - शहरातील महाराज ज.पो.वळवी कला वाणिज्य व श्री.वि.कृ.कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय धडगांव व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिवस तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय गायकवाड उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ते म्हणुन अक्राणी तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात कै. महाराज जनार्दन बाबा यांच्या प्रतिमा पुजनाने झाले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सपकाळे यांनी लोकशाही यशस्वीतेसाठी मतदारांचे योगदान याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मतदार शपथ देऊन केली. आजचा मतदार कसा जागरुत असला पाहिजे त्याने कोणत्याही आमीषाला बळी न पडता योग्य उमेदवाराची निवड केली पाहिजे, तरच देशाची लोकशाही मजबूत पणे टिकुन राहु शकते. त्यासाठी मतदारांनी आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर योग्य पध्दतीने केला पाहिजे असा उपदेश दिला. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त युवकांना जागृत राहून लोकशाहीमध्ये सहभाग घडवणे गरजेचे आहे असे उपदेश केले आपला प्रतिनिधी धर्म असे न बघता योग्य प्रतिनिधी निवडून द्यावे असे आवाहन केले. तसेच भारताची लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदार जागृत होणे गरजेचे आहे असे. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. आजच्या युवकाने आपले अधिकार आणी कर्तव्य याची जाणीव ठेउन पाउल उचलणे गरजेचे आहे तेव्हाच भारताची लोकशाही मजबूत पणे टिकुन राहू शकते असे विद्यार्थ्यांना आव्हान केले.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा.ए. एस. राठोड यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. मनोहर पाटील यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वीरित्या घडवून आणण्या साठी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.डॉ. सुनिल शिंदे व प्रा.अशोक राठोड व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी प्रामुख्याने प्रा. डॉ. एस. आर. महाले, प्रा. डॉ. केशव पावरा, प्रा. राजू पवार. प्रा. डॉ. बी. जी. पवार प्रा. एस. एस. पाटील, प्रा. एन. पी. विभांडीक, प्रा. उर्मिला वळवी, प्रा. डॉ. हरिभाऊ पवार, प्रा. डॉ. विजय गोणेकर, प्रा. डॉ. मनोहर पाटील, प्रा. अनिल शिंदे हे उपस्थित होते.