74वा प्रजासत्ताक दिन लहानग्यांनी उत्साहात साजरा केला
जागृत मित्र मंडळ समर्थ कॉलनी विकास नगर, किवळे येथे आयोजन.
देहूरोड - 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागृत मित्र मंडळ, समर्थ कॉलनी, किवळे येथील लहान मुलांनी प्रजासत्ताक दिनाचे पूर्ण नियोजन करत मंडळातील सदस्य, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला वर्ग यांना एकत्रित करून हा दिन साजरा करण्यात आला. यावेळी लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते राजेन्द्र तरस व ज्येष्ठांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर मुलांनी गणतंत्र दिनाचे महत्त्व, भारतीय संविधानाबद्दल माहिती दिली तसेच आपले हकक, अधिकार आणि जबाबदाऱ्या यांची माहिती सर्वांना दिली. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य व समूह गीत सादर केले. सर्वच कार्यक्रमात मुले हिरीरीने सहभागी होते.
ध्वजारोहण परिसर आकर्षक सजावट करून सजविण्यात आला होता. मुलांनी स्वतःच्या हातांनी तिरंगी कागदी माळा व फुले बनविली होती. आपल्या साठवलेल्या पॉकेट मनीतून ही सजावट केली होती.
लहान मुलांनी केलेल्या गणतंत्र दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन पाहता सर्वच भारावून गेले होते. सर्वांनी या मुलांचे कौतुक केले. त्यांना दिलेली कौतुकाची थाप मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. या नियोजनात मुलांचा उत्साह शेवटपर्यंत कायम होता.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकऱ्यांसह, सदस्य, महिला व ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी सैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिष्का जाधव तर आभारप्रदर्शन खुशी देवाडिगा हिने केले.