ज्ञानदीप मध्ये क्षितीज 2023 उत्साहात साजरा
नांदोरे येथील ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे २०२२-२३ वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दिनांक २०/०१/२०२३ व २१/०१/२०२३ रोजी उत्साहात पार पडला.
२०/०१/२०२३ रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प.डाॅ.जयंत करंदीकर लाभले होते. तसेच मा. ॲड . श्री. तानाजीराव सरदार , मा. श्री. अण्णासाहेब पवार, मा.श्री . विलास साळुंखे, मा ॲड श्री धनंजय बाबर , मा.श्री सत्यवान माने , मा. श्री महावीर कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
नंतर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील नर्सरी ते बारावी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. व स्कूल मध्ये घेण्यात आलेल्या PTS परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच कराटे स्पर्धेतील भिंगारे तेजस वसंत , जगताप संग्राम रघुनाथ , शिरसठ राज सुनील या उत्तुंग भरारी घेतलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमांचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. जयंत करंदीकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
दिनांक २१/०१/२०२३ रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प. डॉ.एकनाथ बोधले लाभले होते. तसेच डॉ.अजीम शेख , डॉ. विजयकुमार सरडे, डॉ. गजानन भिंगारे , डॉ. प्रसाद अंकुशराव, डॉ. सत्यवान माने, डॉ. सिताराम भिंगारे , डॉ. गिरीश शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर आदर्श केंद्र प्रमुख अण्णासाहेब पवार , आदर्श शिक्षक - प्रा. तळेकर कुंडलिक नाना , आदर्श शिक्षिका - प्रा. पाटील लक्ष्मी नागेश , आदर्श पालक - श्री . सुधाकर दत्तू तळेकर , माता पालक - सौ. उषा पांडुरंग उपासे , आदर्श विद्यार्थी - अनुसे शुभम तानाजी , आदर्श विद्यार्थ्यांनी - तवटे काव्या नंदकुमार, उत्कृष्ट विद्यार्थ्यी - गायकवाड आर्या राहूल , आदर्श खेळाडू - थिटे प्रथमेश बापू बेस्ट कोरिओग्राफर, - श्री पवार दिगंबर चंद्रकांत , श्री एन. पी. सर , पुजा लोंढे , यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच शाळेत नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा स्तरीय कबड्डी खोखो स्पर्धेमध्ये उत्तुंग भरारी सर्व प्रशालेंना ट्रॉफी व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यानंतर कार्यक्रमांचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ.एकनाथ बोधले यांनी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले.
दोन्हीही दिवशी वार्षिक स्नेहसंमेलनात मोठ्या प्रमाणात पालक वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते. लोक नृत्य, कोळी गीत, पोवाडा अशा विविध गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य केले .
शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सदाबहार कला सादर करुन उपस्थित प्रेक्षकांना खिळवून ठेवले. यावेळी उपस्थित राजाराम भिंगारे, हरीभाऊ भिंगारे, मारूती भिंगारे, सुनील भिंगारे, युवराज भिंगारे, शरद भिंगारे, नवनाथ नाईकनवरे, कांतीलाल भिंगारे, हरीचंद्र भिंगारे, सत्यवान करांडे, रामचंद्र वाघ, अभिजित पाटील, विजय भिंगारे, हरीभाऊ भिंगारे, गणेश जाधव, विजय राऊत, बंडू गणेशकर, अजय डोके, सुनील सातुरे, वैभव नाईकनवरे, विजयकुमार गुंड आदी उपस्थित होते
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. किरण भिंगारे , प्रकल्प संचालक डॉ.श्री गौतम भिंगारे , सचिव श्री. उमेश कदम उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका नसरीन तांबोळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खुप परीश्रम घेतले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन नागेश इंगोले, प्रियंका आमसुले, प्रणव भोसले यांनी केले.