विधानभवन येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजवंदन
इंडिया न्युज प्रतिनीधी
पुणे दि २६:- भारतीय प्रजासत्ताकाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त विधानभवन प्रांगणात विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, उपायुक्त वर्षा लढ्ढा उंटवाल, राहुल साकोरे, रामचंद्र शिंदे, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते.
प्रतिनीधी:-अभिषेक जाधव