Type Here to Get Search Results !

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयश्री खेचून आणणार -आमदार किसन कथोरे यांचे प्रतिपादन!



कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयश्री खेचून आणणार -आमदार किसन कथोरे यांचे प्रतिपादन!


मुरबाड दि.२७ प्रतिनिधी  लक्ष्मण पवार 

 

 कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, तसेच रिपई(आठवले गट) या महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या निवडणुकीच्या प्रचार संदर्भात तसेच शिक्षक सुसंवाद व कार्यकर्ते संवाद साधण्यासाठी मुरबाड येथील नमस्कार हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे यांनी बोलताना सांगितले की कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना चांगले वातावरण आहे त्यामुळे ते निश्चितच विजय खेचून आणणार असे प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी जमलेल्या शिक्षक व कार्यकर्त्यांच्या सुसंवाद मेळाव्यात केले. 

 



तर जिल्हा परिषद मा.उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी या सुसंवाद शिक्षक व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना सांगितले की खऱ्या अर्थाने महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सभेसाठी जमलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी व कार्यकर्ते यामुळे कोणती चिंता न बालकता या मुरबाड मध्ये बाळासाहेबांची शिवसेना प्रामाणिकपणे काम करते तेव्हा विजय हा निश्चित मानला जातो असे शुभ संकेत सुभाष पवार यांनी यावेळी शिक्षक सुसंवाद व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिले. 




यावेळी व्यासपीठावर बाळासाहेबांची शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, ठाणे जिल्हा परिषद मा.उपाध्यक्ष सुभाष पवार, रिपई आठवले गटाचे ठाणे प्रदेशाध्यक्ष बाळाराम गायकवाड, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत, उल्हास बांगर, रामभाऊ दळवी, नगरपंचायत नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, भाजपा तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव, बाळासाहेबांचे शिवसेना तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे, रिपई तालुका अध्यक्ष दिनेश उघडे यांचेसह सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य, यांच्यासह व्यासपीठावर महायुतीचे तिन्ही घटक पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वच मान्यवरांनी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे संपूर्ण कोकण मतदारसंघात यांना चांगले वातावरण आहे व निश्चित ते विजय होतील असा सर्व मान्यवरांनी शुभ संकेत दिले. 




  तर पुढे बोलताना आमदार किसन कथोरे म्हणाले की ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी गेली सहा वर्षे शिक्षक आमदार नसतानाही त्यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे या कोकण मतदारसंघात शिक्षक आमदारच हवा या हेतूने त्यांना या महायुतीने उमेदवारी दिली आहे त्यामुळे निश्चितच संपूर्ण कोकण मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा मोठ्या प्रमाणात झंझावात निर्माण झाला आहे .त्यामुळे निश्चितच ते विजयश्री खेचून आणतील व आपल्या कोकण मतदारसंघात शिक्षकांना हवा असणारा शिक्षक आमदार मिळेल तसेच मुरबाड मध्ये ५४४ शिक्षकांचे मतदान आहे त्यापैकी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना जवळपास ५३०मते मिळतील असे शुभ संकेत व खात्री दायक विधान आमदार किसन कथोरे यांनी यांनी जमलेल्या शिक्षक सुसंवाद व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News