Type Here to Get Search Results !

अनंत अंबानींचं वजन का वाढतं? जाणून घ्या काय आहे कारण



अनंत अंबानींचं वजन का वाढतं? जाणून घ्या काय आहे कारण


याबद्दल लिहावे असे कालच ठरवत होते. आणि योगायोगाने आज दोन स्त्रियांनी व्हॉट्सॲप मेसेज करून याचा उल्लेख केला, म्हणून लिहिते आहे. 

अनंत अंबानी ने 2016 मध्ये प्रचंड मेहनत घेऊन वजन कमी केले होते. त्याची आर्थिक बाजू मजबूत आहे हे कितीही खरे असले तरीही आरोग्य नुसते पैसे खर्च करून विकत घेता येत नाही. त्यासाठी मेहनत सुद्धा करावी लागते. तो मुलगा दिवसातून पाच सहा तास व्यायाम करत होता. त्यात चालणे, वेट ट्रेनिंग, सगळंच होतं. त्याने भरपूर वजन कमी सुद्धा केले. मात्र अस्थमा असल्याने त्याला काही हेवी steroids घ्यावी लागली.


हो, ॲक्युट अस्थमा असणाऱ्यांना स्वतः चा श्वास सुरू रहावा म्हणून अशी drastic treatment घ्यावी लागते. त्याला सुद्धा अशी मेडीसिन नाईलाजाने घ्यावी लागली आणि त्या steroids च्या दुष्परिणाम म्हणून त्याचे वजन पुन्हा एकदा वाढत गेले. 

ही सर्व माहिती नीता अंबानी म्हणजे त्याच्या आईने जाहीरपणे दिली आहे. 


पुढे ती असेही म्हणते की, "माझ्या मुलाला अस्थमा असल्याने steroids घ्यावी लागली आणि त्याचे वजन वाढले. परंतु तो एकटा नाही. अशी कितीतरी मुलं ओबेसिटी शी झुंज देत आहेत. आपली मुलं जेव्हा आपल्याकडे आशेने पाहतात तेव्हा आई म्हणून आपण त्यांना शक्य तितकी मदत करायला हवी. म्हणूनच मीही त्याच्या सोबत obesity management center मध्ये राहून त्याचे आणि माझे रूटीन जुळवण्याचा प्रयत्न करते"


श्रीमंत लोकांच्या यादीत असणारे हे कुटुंब. तरीही त्यांच्या मुलाने वजन कमी करण्यासाठी liposuction किंवा सर्जरी ची मदत न घेता पूर्णपणे हेल्दी मार्ग वापरून वजन कमी केले होते. मात्र जेव्हा एखादा गंभीर आजार तुम्हाला असतो, तेव्हा वाढणाऱ्या वजनापेक्षा जास्त महत्त्व तुम्हाला वाचणाऱ्या जीवाला द्यावं लागतं. अनंत अंबानी ने तेच केलं. त्याच्या अस्थमा ची तीव्रता कमी झाली तर तो पुन्हा वजन कमी करू शकेल. मला खात्री वाटते की तो हे करेल...


राहिला प्रश्न त्याच्या पत्नीचा... राधिका चा. तिच्यावर पैशांसाठी लग्न केले वगैरे आरोप करणे मला मूर्खपणाचे वाटते. कारण ती स्वतः एका सुखवस्तू कुटुंबातील आहे. शिवाय साखरपुड्यात जो मुलगा अगदी फिट दिसत होता तो लग्नापर्यंत इतका जाड झाला तरीही ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली याबद्दल मलातरी तिचे कौतुक वाटते. एक वाक्य नात्यांबद्दल मी नेहमीच वापरते, "ऑप्शन्स कितीही असू दे, चॉईस ठाम असला पाहिजे" राधिकाच्या वागण्यातून तिचा ठामपणा दिसून आला. आता कुणी असेही म्हणू शकेल, की हा कसला "चॉईस"?

तर मित्रांनो, माणूस म्हणजे फक्त त्याचे शरीर नाही. कदाचित तिला खरंच त्याचा स्वभाव, वर्तणूक आवडली असेल! तिला त्याच्यासोबत सुरक्षित वाटत असेल. जर तसे असेल तर तिला judge करण्याचा आपल्याला काय अधिकार?


उलट आपण अनंत साठी प्रार्थना केली पाहिजे की त्याचा अस्थमा कायमस्वरूपी बरा होऊन तो हेल्दी आयुष्य जगू दे. एक माणूस म्हणून आपण हे करू शकू ना? काय म्हणता?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News