शहीद शिरीषकुमार मंडळातर्फे जिजाऊ विवेकानंदांना अभिवादन
नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील बालवीर चौकात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रतिमापूजनाने अभिवादन करण्यात आले.
शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे राजमाता जिजाऊ यांची 425 वी जयंती आणि राष्ट्र युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची 160 वी जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण केले तर पत्रकार राजू पाटील यांनी
राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस माल्यर्पण केले.महाराष्ट्र शासनातर्फे पत्रकार दिनी मानाचा चौथा स्तंभ पुरस्काराचे मानकरी रमाकांत पाटील यांचा मंडळातर्फे बी.डी. गोसावी यांच्याा हस्ते सन्मान करण्यात आला.तर साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजू पाटील यांचा सन्मान ज्येष्ठ सल्लागार प्रकाश घुगरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनीी केले. अभिवादन कार्यक्रमास शहिद शिरीषकुमार मित्र मंडळाचे सदस्य डॉ. गणेश ढोले, संभाजी हिरणवाळे, राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, तसेच पत्रकार धनराज माळी, राकेश कलाल, जगदीश ठाकुर, वैभव करवंदकर, दीपक सोनार, सुमनसिंग राजपूत, प्रवीण चव्हाण, दीपक सोनार, दिनेश सोनवणे, डॉ. भूषण पालकडे, अनिल कुंभार, नितीन तावडे, दिलीप वाघ, चुडामण पाटिल आदी उपस्थित होते. अभिवादन कार्यक्रमाचे संयोजन नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटना आणि शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशाल हिरणवाळे, प्रफुल्ल राजपूत,सुदाम हिरणवाळे, यांनी केले.