तळोद्यात भिकाभाऊ ठाकरे यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान
नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्था मार्फत तळोदा येथील भिकाभाऊ हरचंद ठाकरे यांनी केलेल्या समाजकार्याची दखल व तळोदा तालुका नाभिक समाज अध्यक्ष म्हणून पंचवीस वर्ष कार्यभार सांभाळून समाज हिताचे कार्य केल्याने व नंदुरबार जिल्हा नाभिक समाज उपाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केले असल्याने त्यांना 2023 च्या समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करून गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार नंदुरबार येथील कार्यक्रमात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामचंद्र शिंपी, युनियन बँकेचे शाखाधिकारी जितेंद्र शिरसाठ, कार्यक्रमाचे अध्यक्ष ओंकार शिरसाठ यांच्या हस्ते देण्यात आला या कार्यक्रमा प्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शशिकला सोनवणे तर प्रास्ताविक हितांशू बोरसे यांनी केले आभार पंकज भदाणे यांनी केले.
सदर पुरस्कार मिळाल्याने भिका बापु यांचे नंदुरबार जिल्ह्यातून व तळोदा तालुक्यातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.