नाभिक समाज प्रबोधन मेळाव्याला समाज बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहावे.... सोनल खोंडे
शिरपूर:-
शिवरत्न जिवाजी महाले व हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त 16जानेवारी ला सकाळी आकरा वाजता एन 12 हडको औरंगाबाद येथे सकल नाभिक समाज औरंगाबाद द्वारा आयोजित नाभिक समाज प्रबोधन मेळाव्याला वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष अड.बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत तर उदघाटक सोमनाथ साळुंके उपाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ, गोविंद दळवी राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,अध्यक्षस्थानी सोपानराव शेजवळ राज्य उपाध्यक्ष नाभिक महामंडळ औरंगाबाद इत्यादी सह समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नाभिक समाजातील विविध समस्याचा निपटारा करण्यासाठी संघटीत् पणे प्रयत्न होने गरजेचे आहे.त्यासाठी सर्व नाभिक समाजामध्ये प्रबोधन होणे अवश्यक आहे.या मेळाव्याच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन होणार असून नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे.तरी धुळे नंदुरबार जळगाव नाशिक जिल्ह्यातील नाभिक समाजातील जबाबदार समाज बांधवानी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य नाभिक सेनाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सोनल खोंडे यांनी केले आहे.