डॉ शशिकांत वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
२१५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
तळोदा : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिराला रक्तदात्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.यात २१५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे या रक्तदान शिबिराचे सलग 29 वे वर्ष होते.
डॉ. शशिकांत वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी 18 जानेवारी रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही ही परंपरा आबादीत ठेवत श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन खा डॉ हिना गावित व आमदत राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजेंद्र राजपूत, भाजपा ओबीसी मोर्चाचे विश्वनाथ कलाल, जेष्ठ नेते रुपसिंग पाडवी, अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष,डॉ स्वपिल बैसाने, श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या संचालिका सुनिता वाणी, अभिषेक मालपुरे,श्रुती मालपुरे, आदिसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
या महारक्तदान शिबिरात शहरासह ग्रामीण भागातील रांझणी, प्रतापपूर, चिनोदा आदि गावांमधून रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले. रक्तदान शिबिरात रक्तदात्यांकडून रक्त संकलनासाठी नंदुरबार येथील नवजीवन रक्तपेढी व जनकल्याण रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते. यात नवजीवन रक्तपेढीचे डॉ. सुनील चौधरी, रोहिदास जाधव, गजानन चौधरी, चंद्रकांत धनगव्हाळ, मेघना जाधव, भावना जाधव तसेच जनकल्याण रक्तपेढीचे डॉ अर्जून लालचांडणी,राजू वाघ,आकाश जैन, यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोठार आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक सी.एम. पाटील, जांभीपाणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ईश्वर चौधरी, हरी भारती, भूषण येवले,मनोज चिंचोले,दीपक मालपुरे,पुरुषोत्तम चिंचोले, यांच्यासह कोठार येथील अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या तसेच अक्कलकुवा तालुक्यातील जांभीपाणी येथील विद्यावर्धिनी निवासी प्राथमिक आश्रमशाळेच्या
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.